State Bank of India ATM Machine esakal
मराठवाडा

SBI Bank : 20 लाखांपेक्षा अधिकची रक्कम असलेलं ATM मशीन चोरट्यांनी मध्यरात्री पळवलं; पोलिसांना सुगावा लागताच..

माजलगाव-धारूर 548 सी महामार्गालगत (Majalgaon-Dharur Highway) भारतीय स्टेट बँकेची (State Bank of India) शाखा कार्यान्वित आहे.

सकाळ डिजिटल टीम

धारूर शहरात भारतीय स्टेट बँकेच्या दोन शाखा कार्यान्वित आहेत. या पैकी एक बँक शाखा धारूर-माजलगाव हायवे लगत अस्तित्वात आहे.

-ईश्वर खामकर

किल्ले धारूर : धारूर शहरात माजलगाव-धारूर 548 सी महामार्गालगत (Majalgaon-Dharur Highway) भारतीय स्टेट बँकेची (State Bank of India) शाखा कार्यान्वित आहे. शाखेच्या समोरील बाजूला बँकेचे एटीएम आहे. या एटीएमला (ATM Machine) कायम पैसे काढणाऱ्यांची वर्दळ असते. (ता. २२) रोजी मध्यरात्री हे एटीएम चोरट्यांनी पळवून नेल्याची घटना घडली. सदरील घडलेल्या घटनेची माहिती पोलीस प्रशासनाच्या सकाळी निदर्शनास आली.

या एटीएममध्ये वीस लाख रुपये पेक्षा अधिकची रक्कम असल्याचे सांगितले जात आहे. पोलीस प्रशासनाला याची माहिती मिळताच चोरट्यांचा पाठलाग केला असता, माजलगावजवळ चोरट्यांनी हे एटीएम फेकून दिल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी ते हस्तगत केले आहे.

धारूर शहरात भारतीय स्टेट बँकेच्या दोन शाखा कार्यान्वित आहेत. या पैकी एक बँक शाखा धारूर-माजलगाव हायवे लगत अस्तित्वात आहे. या बँकेच्या समोर एटीएम आहे. या एटीएममुळे बँक कर्मचाऱ्यांना कामाचा अतिरिक्त ताण कमी होऊन ग्राहकांना अपेक्षित सुविधा पुरवल्या जातात. परंतु, सदरील एटीएम (ता. २२) रोजी मध्यरात्री एका पिकअपच्या साह्याने अज्ञात चोरट्यांनी पळवून नेल्याची घटना घडली.

ही घटना पहाटे पोलीस व बँक कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आली. सदरील चोरी झालेल्या एटीएममध्ये २० लाखापेक्षा अधिकची रोकड ठेवण्यात आलेली होती, अशी प्राथमिक माहिती प्राप्त होत आहे. पोलिसांनी तपासाची चक्र फिरवल्यानंतर एटीएम चोरीसाठी वापरण्यात आलेले पिकअप माजलगाव तालुक्यात आढळून आले आहे. यात एटीएम मशीन देखील पोलिसांनी हस्तगत केले असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघमोडे हे करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT