file photo 
मराठवाडा

वसमतमध्ये सलग तीसऱ्या दिवशी दारुसह साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त

संजय बर्दापुरे

वसमत (जिल्हा हिंगोली) : होळी रंगपंचमी सण उत्सवाच्या य पार्श्वभूमीवर वसमत येथून चोरटी दारुची वाहतूक करणाऱ्यांवर शहर पोलिसांनी रविवारी धाडीचे सत्र सुरु ठेवले. एकूण सोळा धाडीमध्ये तब्बल पावणेतीन लाख रुपयाची देशी व विदेशी दारुसह दोन दुचाकी जप्त करुन जवळपास साडेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्तीची कारवाई केली आहे. ग्रामीण पोलिसानंतर दुसऱ्याच दिवशी शहर पोलिसांनी दारु जप्तीची कारवाई केल्याने चोरटी दारु वाहतूक करणाऱ्यामध्ये व विक्री करणाऱ्यामध्ये चांगलीच भीती निर्माण झाली आहे.

नांदेड व परभणी जिल्ह्यातील लॉकडाऊन व होळी व रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन नसलेल्या हिंगोली जिल्ह्यात रविवारपर्यंत तळीराम व दारु विक्रेत्यांनी सर्वात मोठी आर्थिक उलाढाल केली. मागील पाच दिवसापासून दारुची चोरटी वाहतूक करणाऱ्यांचा सपाटा लागला आहे. दारुची चोरटी वाहतूक मोठ्या प्रमाणात वसमत मधून होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर शहरी व ग्रामीण पोलिसांनी पथके तयार करुन अशा चोरट्या दारूच्या वाहतुकीवर पाळत ठेवली. 

रविवारी (ता. २८) रोजी सतत तिसऱ्या दिवशी धाड टाकून पोलिसांनी लाखो रुपयांची देशी-विदेशी दारु जप्त करुन कारवाई केली. दिवसभरात एकूण सोळा धाडीमध्ये तब्बल पावणे तीन लाखाची देशी व विदेशी दारुसह दोन दुचाकी असा साडेतीन लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तत्पूर्वी ग्रामीण पोलिसांनी शनिवारी दारूसह 10 दुचाकी असा चार लाखाचा मुद्देमाल जप्त केला होता. शहरी व ग्रामीण पोलिसांच्या दारू जप्तीच्या कारवाईने मात्र वसमत शहरातून पार्सल व्यवस्थेचा पर्दाफाश झाल्याची चर्चा नागरिकांमधून ऐकावयास मिळत आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sahyadri Tiger Reserve : वाघांची डरकाळी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात घुमणार, आणखी आठ वाघ वास्तव्यास येणार; केंद्र-राज्य शासनाचा निर्णय

PM Narendra Modi : 'ऑपरेशन सिंदूर' वेळी कॉंग्रेस पाकिस्तानच्या लष्कराच्या पाठिशी; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हल्लाबोल

१६ वर्षांच्या भावाला आणून द्या आणि सामना खेळवा; पहलगाम हल्ल्यात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांचा भारत-पाकिस्तान मॅचला विरोध

Pune Traffic Update : पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी शास्त्रीनगर चौकात उपाययोजना; वाहतूक कोंडीवर तोडगा

Video : शुभांशु शुक्लांनी सांगितलं, अंतराळात व्यायाम कसा करतात? तशीच आसने पृथ्वीवर केल्यास शरीराला कोणते फायदे होतात, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT