polio dose 
मराठवाडा

उदगीर तालुक्यात छत्तीस हजार बालकांना दिला जाणार पोलिओचा डोस

सचिन शिवशेट्टे

उदगीर(लातूर): पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत रविवारी (ता.३१) जानेवारी शहर व ग्रामीण भागातील छत्तीस हजार चारशे एक बालकांना पोलीओ डोस देण्याचे उद्दीष्ट आरोग्य विभागाचे आहे. त्या दृष्टीने पोलिओ लसीकरण मोहिमेचे नियोजन करण्यात आल्याची माहिती उदगीर तालुका  वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत कापसे यांनी सकाळशी बोलताना दिली.

मोहिमेची सुरुवात रविवारी सकाळी आठ वाजता होणार असून तालुक्यातील देवर्जन, हंडरगुळी, नळगीर, हेर, वाढवणा (बु.)  प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत २२ हजार १०१ बालकांना तर  शहरातील १४ हजार ३०० बालकांना पोलिओ डोस  देण्याचे उदिष्टे  आहे.

या मोहिमेसाठी ग्रामीण भागात १६४ बुध शहरी भागात ८५  बुध असतील. प्रत्येक युनीटवर एका वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. त्याशिवाय ६४९ कर्मचारी नियुक्त केले आहेत. शहरात ६ ग्रामिण भागासाठी ८ मोबाइल टीम तयार करण्यात आल्या आहेत.

शरातील रेल्वेस्टेशन, बसस्थानक, चेक पोष्ट सुविधा असणार आहे. बुथवरील रविवारच्या कामानंतर शहरात प्रत्येक घरी जाऊन मुलांना पोलिओ डोस दिला की नाही? याची खात्री केली जाणार आहे. ज्या बालकांनी रविवारी डोस घेतला नाही त्यांना घरी हा डोस दिला जाणार आहे.

या मोहिमेसाठी नगरपालिका, वैद्यकिय अधिकारी, परिचारिका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वैद्यकिय महाविद्यालय, नर्सिंग महाविद्यालय आदींचे सहकार्य मिळणार आहे. या मोहिमेस सहकार्य करावे. तसेच प्रत्येक पालकांनी आपल्या ० ते ५ वर्ष वयोगटातील बालकांना पल्स पोलिओचा डोस देण्याचे आवाहन डॉ. कापसे यांनी केले आहे.

(edited by- pramod sarawale)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT