Rajiv satav 
मराठवाडा

हे हास्य अनंत काळापर्यंत राहावे; सोशल माध्यमावर खासदार राजीव सातव यांना श्रद्धांजली

खासदार राजीव सातव हे हिंगोली लोकसभा मतदार संघात युवकांचे प्ररणास्थान होते. त्यांना प्रत्येक जण भाऊ नावाने बोलत असत

राजेश दार्वेकर

हिंगोली : राज्यसभेचे खासदार राजीव सातव (Mp Rajiv Satav) यांच्या निधनानंतर सोमवारी (ता. १७) कळमनुरी येथे त्यांचा मुलगा पुष्कराज सातव याने साडेअकरा वाजता मुखाग्नी दिला(Funral in kalamanuri). सकाळपासुन सोशलमिडीयावर त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली जात होती. अनेकांनी त्यांच्या सोबतच्या आठवणीना उजाळा दिला. त्यांचे फोटो शेअर करत हे हास्य अनंत काळापर्यंत असेच राहिले पाहिजे अशा शब्द रचना टाकल्या आहेत. (This smile should last forever; Tribute to MP Rajiv Satav on social media)

खासदार राजीव सातव हे हिंगोली लोकसभा मतदार संघात युवकांचे प्ररणास्थान होते. त्यांना प्रत्येक जण भाऊ नावाने बोलत असत त्यांच्या निधनाची बातमी सोशलमिडीयावर झळकताच त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्या आठवणीना उजाळा दिला. सोशलमिडीयावर त्यांचे संग्रहित फोटो व्हायरल करत श्रद्धांजली अर्पण केली. व्हाटसप, फेसबुक, टिव्टर, आदीवर भाऊचे फोटो शेअर केले आहेत. खासदार राजीव सातव यांचे फोटो पोष्ट करून त्यावर अर्ध्यावरती डाव मोडीला, माझे दैवत राजीव भाऊ, आता पुन्हा भेटी झाले, असे दुरावे, डोळ्यातील पाणी डोळ्यात साठवावे, महाराष्ट्राचा उमदा नेता गेला, जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला, आता उरल्या केवळ आठवणी यासह विविध पोष्ट सोशलमिडीयावर दिवसभर सुरू होत्या.

हेही वाचा - नांदेड जिल्हा कोरोनामुक्तीकडे : 273 व्यक्ती बाधित तर नऊ जणांचा मृत्यू

तसेच त्यांचे पार्थिव घेऊन आलेल्या रुग्णवाहिकेचा व्हिडीओ तयार करुन त्याला क्या कभी अंबरसे, सूर्य बिछडता है तसेच जानेवाले ओ कोनसा देश है, वहा तुम चले गये आदी भावस्पर्शी गीतांची जोड देऊन व्हिडीओ शेअर केले जात होते. आज दिवसभर राजीव सातव यांचे फोटो व भावपूर्ण श्रद्धांजली यामुळे सोशलमिडीयावर संदेश झळकत होते. अनेकांनी आपले भाऊ सोबतचे अनुभव, त्यांच्या आठवण, त्यांच्या विषयी लेख लिहत आठवणीना उजाळा दिला.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Goodluck Cafe Viral Video: पुण्यातील गुडलक कॅफेत बन मस्कामध्ये काचेचा तुकडा; खवय्यांमध्ये संताप, व्हिडिओ व्हायरल

टोमणे सहन न झाल्याने टेनिसपट्टू राधिकावर बापानेच झाडल्या गोळ्या; पोलिस तपासात धक्कादायक बाबी उघड, नेमकं काय घडलं?

PG Medical Courses: आरोग्य विद्यापीठाचे पीजी प्रवेश सुरू; तीन अभ्यासक्रमांच्या प्रवेश अर्जासाठी १३ जुलैपर्यंत मुदत

Space Technology Agriculture: स्पेस टेक्नोलॉजीमुळे शेतीत होईल क्रांती! इस्रो शिकवणार उपग्रहांचा शेतीमध्ये उपयोग, आजच करा अर्ज!

संगमनेर हादरलं! 'भूमिगत गटारात गुदमरून दोन कामगारांचा मृत्यू'; ठेकेदाराचा निष्काळजीपणा जबाबदार, नेमकं काय घडलं..

SCROLL FOR NEXT