फोटो 
मराठवाडा

डबल मुंडीकडून १४ हजाराची शिंदी जप्त- डीवायएसपी फस्के

प्रल्हाद कांबळे

नांदेड : विनापरवाना बेकायदेशिररित्या आरोग्यास हाणीकारक असलेली रसायन मिश्रीत १४ हजाराची शिंदी जप्त केली. ही कारवाई शिवाजीनगर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकानी श्रावस्तीनगर ते नागसेननगर रस्‍त्यावर शुक्रवारी (ता. १०) दुपारी केली. 

शहरातील फरार व पाहिजे असलेल्या गुन्हेगारांना अटक करण्याच्या सुचना पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर आणि अतिरिक्त पोलिस अधीक्षक दत्ताराम राठोड यांनी सर्व ठाणेदारांना दिल्या. शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या श्रावस्तीनगर भागात उपविभागीय पोलिस अधिकारी अभिजीत फस्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक यांनी आपले सहकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक रवी वाहूळे यांना गस्त घालण्यास सांगितले. श्री. वाहूळे आपल्या कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन ते श्रावस्तीनगर परिसरात पोहचले. 

हेही वाचा - तीन दिवसांत साडेतीन हजार भाविकांची तपासणी

श्रावस्तीनगर ते नागसेननगर रस्त्यावर

यावेळी त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरुन त्यांनी श्रावस्तीनगर ते नागसेननगर रस्त्यावर शेख जमीर शेख साजीद उर्फ डबल मुंडी (वय २५) याला ताब्यात घेतले. तो संशयास्पद फिरत होता. त्याच्या घराची झडती घेतली असता त्याच्याकडे ११ हजार २५० रुपयाची ४५० लीटर शिंदी आणि एका निळ्या रंगाच्या प्लास्टीक टाकीमध्ये १०० लीटर शिंदी अशी १४ हजाराची ५५० लीटर शिंदी जप्त केली.

सहाय्यक निरीक्षक रवी वाहूळे यांची कारवाई

पंचनामा करून शिंदी बाजूलाच एका खड्ड्यात नष्ट करण्यात आली. सहाय्यक निरीक्षक रवी वाहूळे यांच्या फिर्यादीवरुन शेख जमीर उर्फ डबल मुंडी याच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत पोलिस हवालदार संजय मुंडे, लियाकत शेख, दिलीप राठोड, शिलराज ढवळे, राजकुमार डोंगरे आणि काकासाहेब जगताप यांनी परिश्रम घेतले. 

येथे क्लिक करा - पुण्यात फसलेल्या कुटुंबाला अशोक चव्हाण यांनी दिला आधार

डाक विभागातर्फे गोरगरीबांना 'अन्नपूर्णा किट'

नांदेड :  डाक अधीक्षक शिवशंक लिंगायत यांनी डाक विभागाच्या कल्याण निधीमधून जीवनावश्यक वस्तु 'अन्न पूर्णा किट ' ज्या मध्ये गहू, तांदूळ, गोडतेल, तूर डाळ, हात धुण्यासाठी साबण, मिठ, लाल मिरची अशी मदत देण्यात आली.

संपुर्ण देशात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. संपुर्ण देश लॉकडाउन झाल्यामुळे दररोज मोलमजुरी करून पोट भरणाऱ्या लोकांवर मोठे संकट निर्माण झाले आहे. बाहेर गावाहून मोलमजुरी करून पोट भरण्यासाठी ग्यानमाता शाळेच्या परिसरात अनेक बांधकाम मिस्त्री बाहेर राज्यातील कुटुंब बऱ्याच महिन्यांपासून राहातात. लॉकडाउन झाल्यापासून त्याच्या कुटूंबियावर उपासमारीची वेळ आली. यांचा विचार करून डाक अधीक्षक शिवशंक लिंगायत यांनी डाक विभागाच्या कल्याण निधीमधून जीवनावश्यक वस्तु 'अन्न पूर्णा किट ' ज्या मध्ये गहू, तांदूळ, गोडतेल, तूर डाळ, हात धुण्यासाठी साबण, मिठ, लाल मिरची अशी मदत देण्यात आली.

टपाल विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी

देशावर आलेल्या महासंकटाला दूर करण्यासाठी शासकीय यंत्रणा मदतीचा हात पुढे करत असल्याने गोरगरीब जनतेमध्ये आनंद पसरुन त्यांच्या चेहऱ्यावर हास्य दिसून आल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
या मदतीला सहायक डाक अधीक्षक, पोस्ट मास्तर, डाक निरीक्षक व डाक टीम कर्मचारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana Violence : बुलढाण्यात २ गटात राडा! तलवार अन् शस्त्रांनी वार; शिवसेना नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मृत्यू, ७ जण जखमी

Leopard : दुष्काळात तेरावा महिना, भेंडाळा शिवारात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच; पिंजरा लावण्याची मागणी

Phulambri News : तावडे केणेकरांच्या घरी, चव्हाण भाजप कार्यालयात..! पदवीधरच्या राजकारणात नेमके चाललेय तरी काय?

Mangalwedha News : दिल्लीच्या सीमेवर पंढरपूर मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना रोखले; गनिमी पद्धतीने जंतर-मंतरवर धडक, मागण्यांसाठी आंदोलन

भारत-अमेरिका व्यापार कराराची चर्चा ठप्प! अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT