file photo 
मराठवाडा

तीन फरार आरोपींच्या मुस्क्या आवळल्या !

सकाळ वृत्तसेवा

परभणी : मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटीच्या माध्यमातून ३६ लाखांचा अपहार करून ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या श्री ढोकेश्वर मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटीच्या चेअरमनसह चौघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील तीन फरार आरोपींच्या परभणीच्या आर्थिक गुन्हे पथकाने मुसक्या आवळल्या.
प्रिंप्री देशमुख (ता. परभणी) येथील तक्रारदार चंद्रकांत आबासाहेब देशमुख (वय ३०) यांनी ता. आठ ऑगस्ट २०१८ रोजी श्री ढोकेश्वर मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटीचे चेअरमन व पदाधिकाऱ्यांनी मंत्री कॉप्लेक्स, वसमत रोड, परभणी व जिंतूर येथे सोसायटीच्या शाखा स्थापन करून ठेवीदारांना सोसायटीच्या विविध योजनांवर आकर्षक व्याजाचे व नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्याकडून चालू खाते, बचत खाते, पिग्मी व ठेव स्वरूपात रोख रक्कम स्वीकारून जवळपास ३६ लाख रुपयांचा अपहार केला, अशी तक्रार नवामोंढा पोलिस ठाण्यात केली होती. त्यानंतर आरोपी सोसायटी बंद करून फरार झाले.
 देशमुख यांच्या फिर्यादीवरून सतीश पोपटराव काळे (चेअरमन), अशोक शाहूराव राठोड (क्षेत्रीय अधिकारी), सुनील मधुकरराव मुळे (शाखाधिकारी), संतोष विश्वनाथ आडे (रोखपाल) यांच्या विरुद्ध नवामोंढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेमार्फत सुरू आहे.

दीड वर्षापासून आरोपी फरार
 या गुन्ह्यातील आरोपी मागील दीड वर्षापासून फरार होते. यातील आरोपी अशोक शाहूराव राठोड हा पुणे येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी त्यात ता. १४ जानेवारी रोजी पिंप्री चिंचवड (जि. पुणे) येथून ताब्यात घेतले. दुसरा आरोपी संतोष विश्वनाथ आडे यास तिगाव तांडा (ता. वडवणी, जि. बीड) येथून ता. १५ जानेवारी रोजी, तर तिसरा आरोपी सुनील मधुकरराव मुळे यास ता. २६ जानेवारी रोजी माजलगाव (जि. बीड) येथून ताब्यात घेतले. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या नेतृत्वाखाली फौजदार गंगाप्रसाद दळवी, बाबासाहेब लोखंडे, पोलिस कर्मचारी बाबूराव घरजाळे, संजय वळसे, पंडित खरडे, अमोल वाडेकर, देवानंद भालेराव, सायबर सेलचे बालाजी रेड्डी, राजेश आगाशे यांनी केली.

चेअरमनसह तीघे न्यायालयीन कोठडीत
सोसायटीचा चेअरमन सतिश पोपटराव काळे, क्षेत्रीय अधिकारी अशोक राठोड व  रोखपाल संतोष आडे हे तिघे न्यायालयीन कोठडीत आहेत. सुनील मुळे हा ता. ३० जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी रिमांडमध्ये आहे. सतीश काळे यास नाशिक कारागृहातून हस्तांतरित करण्यात आले आहे. सतीश काळे याच्यावर इतर जिल्ह्यातही अशाच प्रकारचे १८ गुन्हे दाखल असल्याची माहिती सहायक फौजदार बाबासाहेब लोंखडे यांनी दिली.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold-Silver Rate Today: सोनं-चांदीच्या भावात मोठी घसरण! 11 सप्टेंबरला पुन्हा दर कोसळणार? जाणून घ्या ताजी अपडेट

‘त्याला माझी इनसिक्युरिटी वाटायची’; अनेक वर्षांनंतर नीना गुप्तांनी उघड केलं गुपित, म्हणाल्या...'माझ्यापेक्षा जास्त...'

ChatGPT's 80s Photo Trend: Instagram वर व्हायरल होतोय 'ChatGPT ’80s Photo Trend'; 'हा' सोपा प्रॉम्प्ट वापरून तयार करा तुमचा ८० च्या दशकातील रेट्रो लूक!

Marathi News Live Updates : लातूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ; शेतकऱ्यांच्या स्वप्नांची माती, मायबाप सरकारला आर्त हाक

Share Market Today: इराणच्या अमेरिकेला धमकीने शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 500 अंकांनी खाली; कोणत्या शेअर्सला मोठा फटका?

SCROLL FOR NEXT