file photo 
मराठवाडा

पांगरा शिंदे परिसरात दारुसह साडेतीन लाखाचा मुद्देमाल जप्त, कुरुंदा पोलिसांची कारवाई

मारोती काळे

कुरुंदा (ता. वसमत, जिल्हा हिंगोली) : वसमत तालुक्यातील कुरुंदा पोलिस स्थानकाच्या हद्दीतील पांगरा शिंदे शिवारात मंगळवार (ता. १२) रात्री साडेदहाच्या सुमारास अवैध दारुसह तीन लाख ४२ हजार ४३२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कुरुंदा पोलिस स्थानकाच्या हद्दीत असलेल्या पांगरा शिंदे येथे अवैध दारुची वाहतुक करत आसल्याची गुप्त माहीती वरुन पांगरा शिवारात गणेश शिंदे यांच्या शेतालगत मारोती मंदीराशेजारील मोकळ्या जागेत सहाय्यक पोलिस निरिक्षक सुनिल गोपिनवार, सविता बोधनकर, बालाजी जोगदंड संतोष पटवे आदीनी  विशाल गुलाबराव शिंदे यांच्या महिंद्रा मॅक्स गाडीमध्ये देशी दारुचे १७ बॉक्स त्याची किंमत ४२ हजार ४३२ रुपयेकिंमतीचा माल व वाहतुक करणारी जिप असा एकूण तिन लाख ४२ हजार ४३२ रुपये किमतीचा मुद्देमाल छापा टाकुन जप्त केला. या प्रकरणी विशाल गुलाबराव शिंदे, सुशिल रावसाहेब शिंदे रा. पांगरा शिंदे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनिल गोपिनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सविता बोधनकर करीत आहेत.

बासंबा ठाण्याच्या हद्दीत तीन ठिकाणच्या धाडीत देशी दारु जप्त

हिंगोली : तालुक्यातील बासंबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी तीन ठिकाणी पथकाने धाडी टाकून अवैध देशी दारु विक्री करणाऱ्या दुकानावर धाडी टाकून आठ हजार ६६० रुपयाची दारु जप्त करण्यात आली.

सध्या ग्रामपंचायत निवडणुका असल्याने प्रचारही शिगेला पोहचला आहे. उमेदवाराकडून जंगी पार्ट्या, दारु पुरवली जात आहे. त्यामुळे अवैध देशी दारु विक्री करणाऱ्यांचे फावले आहे. अवेध्य दारु विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना कळताच पोलिस उपनिरीक्षक मलपिल्लू यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या सिरसम, पेडगाव, नांदुसा या तीन ठिकाणी छापा मारुन आठ हजार ६६० रुपयांचा अवैध दारुसाठा जप्त करण्यात आला असून तिघांवर बासंबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News : अंधश्रद्धेचा कहर! मुलगा बरा व्हावा म्हणून आईने भोंदू मांत्रिकाच्या सांगण्यावरुन दिला मुलीचा नरबळी, राज्यात खळबळ

Latest Marathi News Live Update : यवतमाळमध्ये आशा स्वयंसेविकांचे काळे कपडे घालून आंदोलन

Ahilyanagar gas Pipeline: अहिल्यानगरवासियांची प्रतीक्षा संपली; गॅस पाइपलाइनचा मार्ग मोकळा; तत्काळ काम सुरू करण्याचे शासनाचे आदेश!

Kashi-Ujjain Tourism: काशी ते उज्जैन थेट कनेक्शन!! महाकाल-विश्वनाथ मंदिर ट्रस्टमध्ये ऐतिहासिक करार; धार्मिक पर्यटनाला बुस्ट

Hanuman Jayanti 2026: हनुमान जयंतीला सुंदरकांड पठण का मानलं जातं सर्वात प्रभावी? मानसिक शक्ती, आरोग्य अन् यशाचे गुपित फायदे काय?

SCROLL FOR NEXT