Vasmat crime sakal
मराठवाडा

Vasmat crime : वसमतच्या मोबाईल व्यावसायिकास तलवारीचा धाक दाखवून लुटणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या...

Vasmat crime : स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाची कामगिरी, वसमतसह नांदेड जिल्ह्यात वाटमारी केल्याची दिली कबुली.

संजय बर्दापुरे

वसमत : नांदेड येथून वसमत येथे रात्रीच्यावेळी दुचाकीवर येत असताना वसमत येथील मोबाईल व्यावसायिकास अडवून तलवारीचा धाक दाखवून मारहाण केली तसेच मोबाईल साहित्यासह अंगावरील सोन्याचे दागिने लुटणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने नांदेड येथून ताब्यात घेतले.

तसेच वसमतसह नांदेड जिल्ह्यात इतर पाच ठिकाणी वाटमारी केल्याची कबूली चोरट्यांनी दिली. केवळ बारा दिवसांत वाटमारी करणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद केल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.

वसमत येथील मोबाईल व्यावसायिक कैलास कदम हा १९ आक्टोंबर २०२४ रोजी नांदेड येथे मोबाईल साहित्य खरेदी करुन रात्रीच्या वेळी दुचाकीवर वसमतकडे येत असताना आसेगाव जवळ तीन अज्ञात चोरट्यांनी तलवारीचा धाक दाखवून मारहाण करीत ९६ हजार रुपयाचा मुद्देमाल लुटल्याची घटना घडली होती.‌

सहायक पोलिस निरीक्षक अनिल काचमांडे, बिट जमादार श्री आडे यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला. याबाबत वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.‌ सदरील गुन्ह्यांचे गांभिर्य ओळखून जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विकास पाटील यांना सदर गुन्हा उघड करण्याच्या सुचना देऊन सहायक पोलिस निरीक्षक शिवसांभ घेवारे यांचे विशेष पथक नेमले होते.‌

विशेष पथकाने आरोपींची तांत्रिक माहिती घेऊन मिळालेल्या गोपनीय माहिती नुसार सदरील गुन्हा हा नांदेड येथील हरज्योतसिंघ चरणजितसिंघ बिंद्रा वय २२ वसरणी नांदेड, बलप्रितसिंघ भुपेंद्रसिंग कदंब वय २६ वसरणी नांदेड व रोहित मारोती जाधव वय २१ वसरणी नांदेड यांनी केल्याचे निष्पन्न झाले. मिळालेल्या माहितीवरुन या तिन्ही आरोपींना नांदेड येथून सिताफिने ताब्यात घेतले.

आरोपींची अधिक चौकशी केली असता त्यांनी वसमतसह नांदेड जिल्ह्यात इतर पाच ठिकाणी वाटमारी करुन जबरी चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, मोबाईल साहित्य असा १५०००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russian Women: मला न कळवता तीने गोवा सोडलं... गोकर्ण जंगलाच्या गुहेत राहणाऱ्या रशियन महिलेचा पती प्रथमच समोर, धक्कादायक माहिती

Bokaro Naxal Encounter : २५ लाखाचं बक्षीस असलेला नक्षलवादी ठार! सुरक्षा दल-नक्षलवाद्यांत तीव्र गोळीबार; कोब्रा बटालियनचा जवानही शहीद

Nagpur News : विद्यार्थी नसलेल्या तीनशे महाविद्यालयांना वेतनासाठी कोट्यवधींचे अनुदान; जनहित याचिका दाखल करण्याचे आदेश

Mahadev Munde Case: आरोपींना अटक नाहीच, Dnyaneshwari Munde यांनी उचललं टोकाचं पाऊल | Beed News

Nagpur Rain : पूर नुकसानीचा अहवाल थंडबस्त्यातच; नुकसानग्रस्तांना शासनाकडून मदतीची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT