संग्रहित छायाचित्र. 
मराठवाडा

हुश्‍श ऽऽऽ कोरोनाचे तीनही संशयित निगेटिव्ह 

सकाळ वृत्तसेवा

जालना -  जिल्हा सामान्य रुग्णालयात दोन दिवसांपूर्वी दाखल झालेल्या दुसरा कोरोना संसर्ग संशयिताचा अहवाल निगेटिव्ह आल्याने दिलासा मिळाला आहे. आतापर्यंत जिल्हा सामान्य रुग्णालयाने दाखल झालेल्या तिघांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी बुधवारी (ता.१८) दिली. 

जालना सामान्य रुग्णालयात ताप, सर्दी अशी लक्षणे असलेल्या पहिल्या संशयित रुग्णाचा शनिवारी (ता.१४) अहवाल निगेटिव्ह आला होता. तर दुसरा संशयित गोवा ट्रीपवर गेलेला महाविद्यालयीन युवक सर्दी व खोकल्याचा त्रास सुरू झाल्याने तो सोमवारी (ता. १६) जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी आला होता. तेथे ऑस्‍ट्रोलियन पर्यटकांच्या संपर्कात आल्याचे त्याने सांगितले होते. त्यामुळे त्याला विलगीकरण कक्षात दाखल करून त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले. त्याच्या लाळेचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल मंगळवारी (ता.१७) रात्री उशिरा पुणे प्रयोगशाळेकडून जिल्हा सामान्य रुग्णालयास प्राप्त झाला. यात दुसरा संशयित रुग्णही कोरोना निगेटिव्ह असल्याचे या अहवालात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल या दोघांना सुटी देण्यात आल्याची माहिती डॉ. मधुकर राठोड यांनी दिली. 

एकास आज देणार सुटी 

एका चीनमधून परतलेल्या संशयित रुग्णास विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. जालन्यात येण्यापुर्वीच त्याचा अहवाल निगेटिव्ह होता. मात्र, दक्षता म्हणून त्याचा अहवाल पुन्हा प्रयोगशाळेला पाठविण्यात आला, हा अहवालदेखील बुधवारी (ता.१८) निगेटिव्ह आला आहे. त्यास गुरूवारी (ता.१९) सुटी देण्यात येणार असल्याचे डॉ. राठोड यांनी सांगितले आहे. 

पाच जणांची नावे सोशल मीडियावर 

जालना शहरात ता. पाच मार्च रोजी थायलंड येथून परतलेल्या पाच जणांची तपासणी केल्यानंतर त्यांना कोरोनाची लक्षणे नसल्याचे दिसून आले आहे. मात्र, या पाच जणांना घरी वेगळे राहण्याचा सल्ला आरोग्य विभागाकडून देण्यात आला आहे; तसेच नगरपालिका मुख्याधिकारी यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत त्यांच्या आरोग्य तपासणी करावी, ती खरी आहेत का? याची खात्री करावी, असे आदेश जालना तहसीलदार यांनी दिले आहेत. मात्र, या आदेशाच्या प्रतीसह थायलंड येथून परतलेल्या पाच जणांची नावे सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Police ACP Vivek Bhagat : महिला पत्रकारांसोबत गैरवर्तन भोवले, एसीपी विवेक भगत यांची पदोन्नती रोखली; सरकारचा अर्ध्या रात्री निर्णय

RBI Repo Rate: 7 ऑक्टोबरला मोठा निर्णय! FD करणाऱ्यांना मिळणार मोठा फायदा? जाणून घ्या काय बदलणार

अटक करणार नाही म्हणत १.३० लाखांची मागणी, लाच घेताना PSIला रंगेहाथ अटक; बोरिवली पोलीस ठाण्यात ACBची मोठी कारवाई

Marathi News Live Updates: ४५ हजार शेतकऱ्यांचे केळी पीक विमा अर्ज नामंजूर; विमा कंपनीच्या कारभारावर गंभीर आरोप

Suryakumar Yadav: सूर्याचा मोठा 'गेम' झाला... आधी विचारलं खेळणार का, त्याने हो म्हटलं अन् निवड समितीने संघाबाहेर केलं

SCROLL FOR NEXT