Latur Corona News 
मराठवाडा

Latur Breaking : लातूर जिल्ह्यात तीन पॉझिटिव्ह अन्‌ चार कोरोनामुक्त

सुशांत सांगवे

लातूर : शहरात दररोज वेगवेगळ्या भागात कोरोनाबाधित रूग्ण आढळून येत आहेत. त्यातच शहरातील भोई गल्लीत आता नवा कोरोनाबाधीत रूग्ण बुधवारी (ता.१७) आढळला आहे. यासह जिल्ह्यात एकुण तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. उर्वरित दोघे हे उदगीरमधील हनुमान नगरमधील आहेत. दुसरीकडे, लातूरातील मोती नगर भागातील तीन आणि उदगीरमधील आझाद नगरमधील दोन, असे चार कोरोनाबाधीत रुग्ण बरे झाल्याने त्यांना आज घरी सोडण्यात आले.
लातूर जिल्ह्यातील एकुण ५२ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते.

त्यातील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे २७ स्वॅब होते. त्यापैकी २५ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून  एका व्यक्तीच्या अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर एका व्यक्तीचा अहवाल अंतिम आला नाही. पॉझिटिव्ह अहवाल आलेली व्यक्ती भोई गल्लीतील (लातूर) असून या व्यक्तीचे वय ५० वर्षे आहे. उदगीरमधून तपासणीसाठी आलेल्या १४ स्वॅबपैकी हनुमान नगर भागातील दोन व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या दोन्ही व्यक्ती आधीच्या कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील आहेत. अकरा जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून एकाचा अहवाल अंतिम आला नाही. लातूरमधील कोवीड केअर सेंटरमधील ११ जणांच्या स्वॅबची तपासणी झाली. या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती विषाणू सांशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.


अतिगंभीर आजार असतानाही कोरोनावर मात
शहरातील मोती नगर येथील रहिवासी असलेले  ६८ व ४६ वर्ष वयाच्या दोन रुग्णांना बुधवारी (ता.१७) पूर्णपणे बरे झाल्यामुळे घरी सोडण्यात आले. त्यापैकी ६८ वर्षे वय असलेल्या महिलेला उच्च रक्तदाब आणि दमा हा आजार होता. तसेच कोरोनामुळे त्यांना निमोनियाही झाला होता. त्यांच्यावर १९ दिवसांपासून उपचार सुरू होते. तब्बल १२ दिवस त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. अतिगंभीर स्वरुपाचा आजार असतानाही त्यांनी कोरोनावर मात केली आहे. ४६ वर्ष वय असलेल्या रुग्णास उच्च रक्तदाब होता.

यासह उदगीरमधील आझाद नगर भागातील दोन जणांना, अशा चार जणांना बरे झाल्याने आज घरी सोडण्यात आले, अशी माहिती कोरोना विलगीकरण कक्षाचे प्रमुख डॉ. मारुती कराळे, डॉ. निलिमा देशपांडे, डॉ. गजानन हलकंचे यांनी दिली.  दरम्यान, लातूर जिल्ह्यातील सध्या एकूण कोरोनाबाधितांची संख्या २११ झाली आहे. त्यातील ६४ जणांवर सध्या उपचार सुरू असून तब्बल १३७ जण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजवर उपचारादरम्यान दहा जणांचा मृत्यू झाला आहे, असे आरोग्य विभागाने जाहीर केले आहे.

कोरोना मीटर
एकुण बाधित : 211
उपचार सुरू असलेले 64
बरे झालेले 137
मृत्यू : 10

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्यावर छगन भुजबळ का बोलत नाहीत? स्वत:च भुजबळांनी सांगितलं कारण

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन दगडूशेठच्या दर्शनाला

Satana News : बागलाणमध्ये सरसकट पीक पंचनाम्यांची मागणी; राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा तहसीलदारांना घेराव

Farmer Rasta Roko : विविध मागण्यासाठी शेतकऱ्यांनी रोखला महामार्ग; वाहतूक विस्कळीत

Palghar News : पालघर रुग्णालय राडा प्रकरणात शिवसेना पदाधिकारींच्या अडचणी वाढणार?

SCROLL FOR NEXT