Corona  sakal
मराठवाडा

बीड : टक्का घटला; तीन मृत्यू कोरोना ;तपासण्या वाढल्या

१४९ रुग्ण; पॉझिटिव्हिटी ७.३९ टक्के

सकाळ वृत्तसेवा

बीड : मधल्या काळात घटलेली स्वॅब नमुन्यांच्या तपासण्यांची संख्या वाढून दोन हजारांच्या पुढे गेल्याने पॉझिटिव्हिटी रेटमध्ये काहीशी घसरण झाली. मात्र, थंडावलेली मृत्यूसाखळी पुन्हा सुरु झाली. गुरुवारी (ता. तीन) आणखी तीन कोरोनाबळींची नोंद झाली. तर १४९ रुग्ण आढळले. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वाढून तीनशेंच्या घरात पोचली होती. मात्र, नंतर हळूहळू ही संख्या उतरणीला लागून शंभरपर्यंत कमी झाली होती.

मात्र पॉझिटिव्हिटी रेट (स्वॅब नमुन्यांच्या तपासणीच्या तुलनेत रुग्ण आढळण्याचे प्रमाण) मात्र १० ते १५ टक्क्यांच्या आसपास होते. तसेच स्वॅब नमुन्यांची तपासणींची संख्याही हजार व कधी हजारांच्या आत आली होती. बुधवारी (ता. दोन) मात्र २०१४ स्वॅब नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यात रुग्णांची संख्या १४९ तर तपासणीच्या तुलनेत रुग्ण आढळण्याचे प्रमाण घटून ७.३९ टक्क्यांवर पोचले. दरम्यान, अंबाजोगाई तालुक्यात २०, आष्टीत २५, बीडमध्ये ३४, धारुरमध्ये आठ, गेवराईत नऊ, केजमध्ये सात, माजलगावमध्ये १६, परळीत १०, पाटोदात ११, शिरुर कासारमध्ये पाच तर वडवणीत चार रुग्ण आढळले. जिल्ह्यात आतापर्यंतच्या कोरोनाच्या तीन लाटेत एक लाख ७७३९ रुग्ण आढळले आहेत. यातील एक लाख ३८७७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर, सध्या एक हजार पाच सक्रिय रुग्ण असून यातील ९२ रुग्ण उपचाराखाली आहेत. एकूणच या लाटेत गंभीर आजार असलेल्यांची संख्या दहा टक्क्यांपेक्षाही कमी असल्याचे उपचार घेणाऱ्यांच्या संख्येवरून दिसते.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत जिल्ह्याचा मृत्यूदर साडेतीन टक्क्यांच्या घरात होता. दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या अधिक असली तरी मृत्यूदर घटला होता. आता जिल्ह्याचा मृत्युदर २.६५ टक्के असून राज्याच्या सरासरी मृत्युदराच्या तुलनेत बीड जिल्ह्याचा मृत्यूदर अधिक आहे. दरम्यान, मधल्या काळात मृत्यूसाखळी खंडीत झाली होती. पण, या चार दिवसांत पुन्हा रोज मृत्यूनोंद होत आहे. गुरुवारी आणखी तीन मृत्यूंची भर पडली. आतापर्यंत २८५७ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : खरातची अज्ञातस्थळी चौकशी, एसआयटीने चौकशीचं ठिकाण बदललं

Parbhani News: फ्लॅट संस्कृती वाढली; पण घर घेणे झाले महाग!; रेडीरेकनर दरवाढीचा फटका;नागरिकांचे बजेट कोलमडले

IPL Viral Video: ए चल निघ आता... इशान किशनला आऊट करत SRH च्याच गोलंदाजाचा रागात इशारा, मग पुढे...

Raam Navami 2026: रामनवमीपूर्वी 'या' 5 गोष्टी घरात आणा, सुख-समृद्धी निश्चित अन् माता लक्ष्मीचे आगमनही होईल

ना कुत्रा ना मांजर; पूजा सावंतला घरात पाळायचा आहे हा भयंकर प्राणी ! अभिनेत्रीचा खुलासा

SCROLL FOR NEXT