व्यापाऱ्याचे तीन लाख लंपास 
मराठवाडा

शिरडशहापूर येथे व्यापाऱ्याच्या डोळ्यात तिखट टाकून तीन लाख लंपास

सुभाष उत्तरवार यांनी चोरट्यासोबत झटापटसुद्धा केली. तसेच चोरट्यांनी गेट वॉचमेन यांच्या डोळ्यात सुद्धा तिखट टाकले.

सय्यद मुजाहेद

शिरड शहापूर ( जिल्हा हिंगोली ) : औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर येथे व्यापाऱ्याच्या डोळ्यात तिखट टाकून तीन लाख दहा हजार रुपये पळविल्याची घटना शनिवारी (ता. पाच) पहाटे एक वाजताच्या दरम्यान घडली आहे.

याबाबत माहिती अशी की, शिरडशहापूर येथे औंढा- वसमत राज्य मार्गावर कोसलगे यांची श्री वेंकटेश्वर ट्रेडिंग कंपनी या नावाने आडत दुकान आहे. त्यांच्या दुकानावर ट्रकमध्ये हळद भरण्याचे काम चालले होते. नंतर रात्री साडेअकरा वाजता हळदीने भरलेला ट्रक रवाना करुन व्यापारी सुभाष उत्तरवार रा. वसमत हे शिरडशहापूर बसस्थानकाजवळ गजू मुकिरवार यांच्या घरी जात असताना घराच्या गेटजवळ अज्ञात व्यक्तीने सुभाष उत्तरवार यांच्या डोळ्यात तिखट टाकून त्यांच्याजवळील तीन लाख १० हजार रुपये असलेली बॅग ज्यामध्ये चोरट्यांनी जबरीने चोरुन नेली.

हेही वाचा - जागतिक पर्यावरण दिन विशेष : वृक्ष लागवडीतून झाडांनाही श्वास देऊयात

सुभाष उत्तरवार यांनी चोरट्यासोबत झटापटसुद्धा केली. तसेच चोरट्यांनी गेट वॉचमेन यांच्या डोळ्यात सुद्धा तिखट टाकले. उत्तरवार यांनी आरडाओरड केली असता घरमालक गजु मुकीरवार हेसुद्धा बाहेर आले. तोपर्यंत चोरटे पैसे घेऊन पसार झाले होते. या घटनेची माहिती मिळताच पोलिस उप अधिक्षक वसीम हाश्मी, कुरुंदा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील गोपीनवार, हवालदार बालाजी जोगदंड, संतोष पटवे, इम्रान सिद्दिकी यांनी घटनास्थळी धाव घेऊन पसार झालेल्या चोरट्यांचा शोध घेतला. कुरुंदा पोलिस ठाण्यात श्री. उतरवार यांच्या फिर्यादीवरुन जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway In Maharashtra : साताऱ्याच्या दुष्काळी मातीला येणार सोन्याचे दिवस! 'या' 3 तालुक्यांचा चेहरामोहरा बदलणार; जाणून घ्या काय आहे मेगा प्लॅन?

Government Job: SSC CGL 2026 नोटिफिकेशन जारी! 12,256 जागांसाठी मेगाभरती; जाणून घ्या परीक्षा तारखा ते अर्ज प्रक्रिया एका क्लिकवर

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरात दऱ्याचे वडगाव ग्रामस्थांचा करवीर पंचायत समिती कार्यालयावर मोर्चा

Daund Manmad Railway: दौंड-मनमाड रेल्वे दुहेरीकरणाचा फटका; सोलापूर विभागातील गाड्या तासन्तास उशिराने, सोलापूर विभागातील रेल्वे वेळापत्रक कोलमडले

Raigad: रायगड किल्ल्याचा पायरी मार्ग दोन दिवस बंद राहणार, प्रशासनाचा मोठा निर्णय, कधी आणि का?

SCROLL FOR NEXT