नांदेड जिल्ह्यात लसीकरण 
मराठवाडा

उस्मानाबाद जिल्ह्यात तीन लाख नागरिकांचे लसीकरण पूर्ण

सकाळ वृत्तसेवा

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर लसीकरणासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करण्यास सुरवात केली होती. काही ठिकाणी पहाटेपासून रांगा लागत होत्या.

उस्मानाबाद : जिल्ह्यात Osmanabad आतापर्यंत तीन लाख १५ हजार नागरिकांचे लसीकरण Corona Vaccination पूर्ण झाले आहे. जिल्ह्याच्या लोकसंख्येनुसार लसीकरणाचा वेग वाढविण्याची मागणी होत आहे. परंतु, पुरेसा प्रमाणात साठा उपलब्ध होत नसल्याने लसीकरणाची मोहिम यापुढे अनेक दिवस रेंगाळत कासव गतीने सुरू राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत. कोरोनाच्या Corona दुसऱ्या लाटेनंतर लसीकरणासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करण्यास सुरवात केली होती. काही ठिकाणी पहाटेपासून रांगा लागत होत्या. मात्र, सध्या दुसरी लाट ओसरल्याने लसीकरणाच्या प्रक्रियेचा वेग मंदावत आहे. सध्या लसीकरणाची मोहिम विविध वयोगटानुसार राबविली जात आहे. यात १८ ते ३०, ३० ते ४४, ४४ ते ६० आणि ६० वर्षे वयापुढील नागरिक यांचा समावेश आहे. ६० वर्षांपुढील नागरिकांचे आजवर ६० टक्क्यांच्या पुढे लसीकरण पूर्ण झाले आहे. जिल्ह्यातील तब्बल तीन लाख १५ हजार २९९ नागरिकांना लसीकरणाचे डोस देण्यात आले आहेत. यातील दोन लाख ५८ हजार ७५९ नागरिकांना पहिला डोस देण्यात आला आहे. तर ५६ हजार ५४० नागरिकांना दुसरा डोस दिला आहे. त्यामुळे लसीकरणाची मोहीम पूर्ण झालेल्यांची संख्या अगदीच कमी आहे. त्यातच लसीचे डोस कमी मिळत असल्याने संपूर्ण लसीकरणाची मोहीम रेंगाळणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. विशेष म्हणजे किती दिवसांत जिल्ह्यातील लसीकरण पूर्ण होणार? हे सांगणे कठीण आहे.Three Lakh People Of Osmanabad District Take Corona Vaccination

आतापर्यंत १३२ गावांत लसीकरण

जिल्ह्यात ४४ प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. तेथे लसीकरणाच्या अनेक फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. तर १८१ उपकेंद्रे आहेत. या सर्वच ठिकाणी तीन वेळा लसीकरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे संबंधित गावातील ६० वर्षांपुढील लसीकरण पूर्ण होत आहे. अन्य गावांत लसीकरणाचे शिबिर झालेले नाहीत. सध्या प्रशासनाने गावागावांत लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ६० वर्षांपुढील नागरिकांचे १०० टक्के लसीकरण करण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. सध्या नवीन ४४ गावांत लसीकरण करण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण १३२ गावांत लसीकरणाची मोहीम होत असल्याने तेथील १०० टक्के लसीकरण पूर्ण होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT