CoronaVirus
CoronaVirus 
मराठवाडा

CoronaVirus : उस्मानाबादसाठी दिलासादायक बातमी, कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह

सकाळवृत्तसेवा

उमरगा, (जि. उस्मानाबाद) :  येथील कोरोना रूग्णालयात उपचार सुरू असलेल्या तिन कोरोना बाधित रुग्णाचा अहवाल शुक्रवारी (ता. १७) रात्री साडे अकराच्या सुमारास प्राप्त झाला. तिघांचाही अहवाल निगेटिव्ह आल्याने उमरगेकरांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान पॉझिटिव्ह आलेल्या त्या दोन रुग्णांच्या संपर्कातील लोकांचे दुबार  तपासणी अहवालही निगेटिव्ह आले असून आत्तापर्यत तपासणीसाठी पाठविलेल्या १७१ स्वॅब पैकी दोघांचे पॉझिटिव्ह, १६६ जणांचे निगेटिव्ह अहवाल आले आहेत. तर तिघांचा निष्कर्ष काढता येत नाही.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

हॉयरिस्कमधील ३९ जणांचे अहवाल निगेटिव्ह 

पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांना विषाणूची बाधा झाल्याची खात्री करण्यासाठी आरोग्य विभागाने दुबार स्वॅब पाठविण्याचे नियोजन केले होते. तालुक्यातील एका गावातील २२ जणांना खबरदारी म्हणून हॉयरिस्कच्या यादीत घेण्यात आले होते, त्यातील बहुतांश जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. उमरगा शहरातील सतरा जणांना हायरिस्क मध्ये घेण्यात आलेल्या सतरा लोकांचाही अहवाल  निगेटिव्ह आला आहे. दरम्यान या सर्व लोकांना कांही लक्षणे दिसून येत असल्यास पून्हा स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती सांगण्यात आली.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

पॉझिटिव्ह रुग्णाचे अहवाल निगेटिव्ह आल्याने मिळाला दिलासा
तालुक्यातील एका गावाच्या एका पॉझिटिव्ह रुग्णावर एक एप्रिलपासून येथील कोरोना रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर शहरातील एक व लोहारा तालुक्यातील एक रुग्णावर उपचार सुरू होते. तिघेही उपचाराला तो प्रतिसाद देत होते, त्यांची प्रकृतीही स्थिर आहे. उपचाराचा चौदा दिवसाचा कालावधी पूर्ण झाल्याने गुरूवारी (ता. १६) त्या तिघांचे स्वॅब तपासणीला पाठविण्यात आले होते. शुक्रवारी (ता. १७) रात्री त्यांचा अहवाल प्राप्त झाला आणि तो निगेटिव्ह आल्याने उमरगेकरांना दिलासा मिळाला आहे. 
 
अहवाल निगेटिव्ह तरीही ... !

पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील  त्या बहुतांश लोकांचे दुबार अहवाल निगेटिव्ह आले असले तरी त्यांची आणखी एक तपासणी होऊ शकते. शिवाय कसलीही लक्षणे नसताना अचानक अहवाल पॉझिटिव्ह येऊ शकतो. असे कांही ठिकाणी दिसून आल्याने नागरिकांनी स्वतःच्या सूरक्षिततेसाठी बाहेरचा संपर्क टाळून घरी थांबणे योग्य रहाणार आहे. दरम्यान पॉझिटिव्ह रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने दिलासा मिळाला आहे, त्यांचे अहवाल पुन्हा तपासणीला पाठविण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

 

" बाधित रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने रुग्णासह त्यांचे नातेवाईक आणि तमाम नागरिकांना दिलासा मिळाला आहे. जिल्हाधिकारी दिपा मुधोळ- मुंढे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राज गलांडे यांच्या मार्गदर्शनाने आरोग्य विभागातील सर्व डॉक्टर्स, कर्मचाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नाला यश आले आहे. येथील लोकप्रतिनिधी, महसूल व पोलिस यंत्रणेचेही मोलाचे सहकार्य होते. त्या बाधित रुग्णांचा स्वॅब आज परत तपासणीला पाठविण्यात येणार आहे. बाधित अथवा संपर्कातील लोकांचे अहवाल निगेटिव्ह आलेले असले तरी त्यांनी आणखी कांही दिवस बाहेरचा संपर्क टाळणे गरजेचे आहे.  अहवाल निगेटिव्ह आले म्हणून कुणीही गाफील राहू नये. नेहमीप्रमाणे घरात थांबणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे महत्वाचे आहे. - डॉ.पंडीत पुरी, वैद्यकिय अधिक्षक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: 'ती भटकती आत्मा कोण PM मोदींना विचारणार', शरद पवारांवर केलेल्या अप्रत्यक्ष टीकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया

Latest Marathi News Live Update : दादर पूर्वच्या शिंदे वाडी येथून १.१४ कोटींची रोकड जप्त

Mumbai Lok Sabha: मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून रवींद्र वायकर शिवसेनेचे उमेदवार

T20 WC 24 Team India Squad : ना अय्यर... ना राणा... शाहरुख खानने 'या' खेळाडूला संघात घेण्याची केली मागणी

Karmaveerayan: 'कर्मवीरायण' मधून उलगडणार कर्मवीर भाऊराव पाटील यांचं जीवनचरित्र; 'या' दिवशी रिलीज होणार चित्रपट

SCROLL FOR NEXT