file photo
file photo 
मराठवाडा

तिघांनी केल्या आत्महत्या.....कारण काय ते वाचा

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात तीन घेटनेत तिघांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. यात एका शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून विषारी औषध घेवून आत्महत्या केली. तर दुसऱ्या घटनेतही एका पन्नास वर्षीय व्यक्तीने विषारी औषध घेवून आत्महत्या केली. तिसऱ्या घटनेत एका तरुण विवाहितेने सासरी गळफास लावुन आत्महत्या केली आहे. या प्रकरणी संबधीत पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.     

तरुण शेतकऱ्याची आत्महत्या
हदगाव तालुक्यातील पांगरी येथील नागोराव रामराव तांबारे (वय 27) या तरुण शेतकऱ्याने सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गुरुवारी (ता.16) दुपारी चार वाजता विष प्राशन करुन आत्महत्या केली. पांगरीमध्ये झालेल्या घटनेप्रकरणी रामराव लक्ष्मण तांबारे यांच्या माहितीवरुन तामसा पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. या प्रकरणाचा तपास फौजदार श्री.जगाडे तपास करीत आहेत.\

विवाहितेची आत्महत्या
नांदेड तालुक्यातील किकी येथील शामबाला कैलास किरपणे (वय २८) या विवाहित महिलेने बुधवारी (ता. १५) रात्री नऊ ते गुरुवारी (ता. १६) सकाळी सातच्या सुमारास घराच्या छताला दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. या प्रकरणी मयत महिलेचा पती कैलास उत्तम किरपणे यांच्या माहितीवरुन नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक श्री कासले तपास करीत आहेत. आत्महत्येचे कारण अद्याप समजु शकले नाही.


विष घेतलेल्या व्यक्तीचा मृत्यु
कंधार तालुक्यातील कलाळी येथील मारोती विश्वांभर पवार (वय ५०) या व्यक्तीने अज्ञान कारणावरुन औषध प्राशान केले. यानंतर मुखेड येथील उचारासाठी दाखल केले असता मंगळवारी (ता. १६) सायंकाळी सात वाजता त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी मुखेड पोलिस ठाण्याचे पोलिस नाइक डी. एम. धोंडगे यांच्या माहितीवरुन कंधार पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. या प्रकरणाचा तपास जमादार श्री चोपडे तपास करीत आहेत.

इतर घटनेत अडीच लाखाची चोरी
शहरातील जुना मोंढा जवळील नवीन पुलाजवळ असलेल्या साइ जमुना (रावत) कॉम्पलेक्समध्ये चोरट्यांनी बुधवारी (ता. १५) रात्री साडेनऊ ते गुरुवारी (ता. १६) सकाळी सातच्या दरम्यान दुकानाचे शट्टर वाकवून आत प्रवेश केला. यानंतर दुकानातील सिगारेटचे बंडल व लाकडी गल्यातील नगदी रुपये असा एकूण दोन लाख ३८ हजार चारशे रुपयांचा एवज चोरुन नेला. या प्रकरणी धोंडू शंकर पत्तेवार (रा. केशवेनगर) यांच्या फिर्यादीवरुन इतवारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास फौजदार बी. आर. गीते करीत आहेत.


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT