file photo 
मराठवाडा

थरार...! गुन्हेगार पुढे, पोलिस मागे...अन्.

प्रल्हाद कांबळे

नांदेड : सार्वजनीक ठिकाणी एखादा गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत असलेल्या अट्टल तीन चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानी चित्रपटाला लाजवेल अशा पद्धतीने पाठलाग करून जेरबंद केले. यातील एका आरोपीवर विविध प्रकारचे पंधराहून अधीक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी तलवार, खंजर व एक दुचाकी जप्त केली. ही कारवाई रविननगर कौठा चौकात रविवारी (ता. २३) सायंकाळच्या सुमारास केली. 

पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, शहर व जिल्ह्यातील पोलिस दप्तरी फरार व पाहिजे आरोपींच्या मुसक्या आवळण्याच्या सुचना पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर आणि अतिरिक्त पोलिस अधीक्षक दत्ताराम राठोड यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांना दिल्या. यावरून श्री. चिखलीकर यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक रमाकांत पांचाळ यांच्या पथकाला शहरात गस्त घालण्यास सांगितले. 

अटक केलेल्यांपैकी एक सराईत

श्री. पांचाळ हे आपल्या सहकाऱ्यांसह जुना कौठा परिसरात गेले असता त्यांना कौठा चौकात गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत असलेला अट्टल गुन्हेगार इश्‍वरसिंग गिरणीवाले व त्याचा एक साथीदार एका दुचाकीवर दिसले. त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र ते आपली दुचाकी घेऊन पळत असतांना त्यांचा पाठलाग करत अखेर दोघांना ताब्यात घेतले. तब्बल अर्धा तास गुन्हेगार पुढे तर पोलिस मागे हा थरार कौठा येतील अनेकांनी पाहिला. शेवटी पोलिसांनी या दोघांना पकडले. यावेळी या दोघांना का पकडले असा जाब विचारणाऱ्या तिसऱ्यालाही पोलिसांनी इंगा दाखवत ताब्यात घेतले. या तिघांकडून एक तलवार, खंजर व दुचाकी जप्त केली. 

नांदेड ग्रामिण पोलिसांकडे सुपूर्त 

त्यांची अंगझडती घेऊन त्यांना नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्यात हजर केले. सहाय्यक पोलिस निरीक्षक रमाकांत पांचाळ यांच्या फिर्यादीवरुन नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्यात भारतीय हत्यार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक पंडीत कच्छवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक श्री. सुर्यवंशी करत आहेत.

गुन्हेगारीवर नियंत्रण 

नांदेड शहर व जिल्ह्यातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवत अनेक अवैध धंद्याविरूद्ध कठोर पावले उचलले. त्यामुळे पूर्वी खंडणी व दहशतीचे वातावरण कमी झाले. व्यापारी वर्गात भितीचे वातावरण कमी केले. शहरात बॅग लिफ्टींग, चैन स्नॅचर व मोबाईल व दुचाकी चोरांना त्यांची जागा दाखविली. अनेक सराईत गुन्हेगार सध्या नांदेड, औरंगाबाद कारागृहात शासकिय पाहूणचार घेत आहेत. यापुढेही काही गुन्हेगारांची हद्दपारीचे प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत.
-विजयकुमार मगर, पोलिस अधीक्षक, नांदेड.   
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आयोगाच्या बाजूने उत्तर देत नाही म्हणत भाजपनेही मतदारयादीतला घोळ पुराव्यासह दाखवला, 'सत्याचा मोर्चा'तलाच व्हिडीओ लावला

Women's World Cup : भारतीय महिला संघाचे गाणं ऐकलंत का? चार वर्षांपूर्वी ठरवलं होतं, जेव्हा वर्ल्ड कप जिंकू तेव्हा... Video Viral

Latest Marathi News Live Update : राज ठाकरे व्होट जिहाद करतायेत - आशिष शेलार

Anil Ambani Assets Seized : ईडीची अनिल अंबानींविरोधात सर्वात मोठी कारवाई; मुंबई, पुण्यासह देशभरातील हजारो कोटींची संपत्ती जप्त

७० पेक्षा जास्त क्रिकेटर अडकले हॉटेलमध्ये, फायनलआधी आयोजकच फरार; गेल, गुप्टिलसह अनेक दिग्गजांचा स्पर्धेत सहभाग

SCROLL FOR NEXT