Stone attack on bus sakal
मराठवाडा

तीन महिन्यांनंतर आगारातून बाहेर पडलेल्या बसवर दगडफेक

हिंगोली आगारातुन तब्बल तीन महिन्यानंतर बाहेर एसटी बसवर अज्ञातांनी दगडफेक केल्याची घटना सेनगाव जिंतूर रोडवरील मकोडी फाटा येथे घडली.

विठ्ठल देशमुख

हिंगोली आगारातुन तब्बल तीन महिन्यानंतर बाहेर एसटी बसवर अज्ञातांनी दगडफेक केल्याची घटना सेनगाव जिंतूर रोडवरील मकोडी फाटा येथे घडली.

सेनगाव (जि. हिंगोली) - हिंगोली आगारातुन (Hingoli Depo) तब्बल तीन महिन्यानंतर बाहेर एसटी बसवर (St Bus) अज्ञातांनी दगडफेक (Stone Attack) केल्याची घटना सेनगाव जिंतूर रोडवरील मकोडी फाटा येथे घडली आहे. पाथरी येथील वाहतूक निरीक्षकाच्या फिर्यादीवरून सेनगाव पोलिसात गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.

ऐन दिवाळी सनावर एस टी कामगारांनी विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन पुकारले होते. त्यांच्या मागण्या अद्याप मान्य झाल्या नाहीत. त्यामुळे अजूनही कर्मचारी कामावर हजर झालेले नाहीत. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होताना दिसत आहेत. याचा फायदा खाजगी वाहतूकदारांना होत आहे. प्रवाशांचे हाल पाहता शुक्रवारी (ता.२८) दुपारी तीन वाजताच्या सुमारास वाहतूक निरीक्षक शरद भाऊराव पाटील व वाहक विनोदकुमार भागवत बिल्लारी हे दोघे हिंगोली आगारातील बस क्र.एम.एच.२० बी.एल.३५०६ ही बस हिंगोली ते जिंतूर अशी सेनगाव मार्गे जिंतूरकडे दुपारी ३.४० वाजताच्या सुमारास निघाली होती.

मात्र, मकोडी फाट्यावर दोन अज्ञात व्यक्ती मोटारसायकल वरून तोंडाला रुमाल बांधून आले होते. त्यांनी हातात दगडं घेऊन बसच्या समोरील काचावर फेकून काचा फोडल्या असून अंदाजे १० ते १५ हजार रुपयांचे नुकसान केले आहे. अशी फिर्याद कर्मचाऱ्यांनी सेनगाव पोलिसांना दिली आहे. दगडफेक कोणी केली हे मात्र अद्याप समजू शकले नाही. मात्र बसच्या काचा फोडल्याने बसचं मोठं नुकसान झाल आहे. सुदैवाने यात चालक आणि वाहक यांना कुठलीही दुखापत झाली नाही. सेनगाव पोलिस या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Kisan Samman Nidhi : प्रतिक्षा संपली ! देशातील १० कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 'या' दिवशी जमा होणार २००० रुपये

Ranji Trophy: महाराष्ट्रासाठी अर्शिन कुलकर्णीचं शतक, तर पृथ्वी शॉची फिफ्टी, मुंबईकडूनही तिघांची अर्धशतकं; पण विदर्भाचा डाव गडगडला

Palghar : भाजपने पालघर साधू हत्याकांडाचे आरोप ज्यांच्यावर केले त्याच नेत्याला घेतलं पक्षात, प्रवेशाचा मोठा कार्यक्रम

Accident News: मक्का मदिनाजवळ भीषण अपघात! ४२ भारतीयांचा होरपळून मृत्यू; डिझेल टँकरला बस धडकली अन्...

Vanaz Metro Subway Issues : रस्ता ओलांडायचा तर भुयारी मार्गातूनच; पण अनधिकृत पार्किंगमुळे पादचाऱ्यांचा जीव मेटाकुटीला

SCROLL FOR NEXT