Latur News, Yerol 
मराठवाडा

पावसापासून बचावासाठी थांबले, पण वीज पडून दोघा तरुण शेतकऱ्यांचा मृत्यू

शिवानंद भुसारे

येरोळ (जि.लातूर) : दक्षिण शेंद (ता.शिरुर अनंतपाळ) येथे गुरुवारी (ता.२५) सायंकाळी साडेचारच्या दरम्यान अचानक विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. पावसापासून बचावासाठी आंब्याच्या झाडाखाली थांबलेल्या दोन तरुण शेतकऱ्यांवर विज पडल्याने जागेवरच मृत्यू झाला. ही घटना घडल्याने शेंद गावावर शोककळा पसरली आहे. दक्षिण शेंद येथे शेतात सोयाबीन उगवण झाले की नाही हे पाहण्यासाठी शेतात गेले असता साडेचारच्या दरम्यान पाऊस पडत असल्याने आंब्याच्या झाडाखाली अभिजित राजकुमार मोरे (वय १९) व गौतम दिगांबर कांबळे (वय ३२) हे दोघे तरुण शेतकरी थांबले होते.

आकाशात विजेचा तीव्र कडकडाट होऊन विज पडून या दोघाचांही जागीच मृत्यू झाला.
अभिजित मोरे हा दहावीत शिक्षण घेत होता, तर गौतम कांबळे हा मजूरी करुन घराची उपजीविका भागवत होता. त्याच्या पश्चात दोन मुली, पत्नी असा परिवार आहे. ही घटना ज्या ठिकाणी घडली त्या ठिकाणच्या परिसरामध्ये इतर शेतकरी शेतामध्ये काम करत होते आणि त्यांच्या समोरच हे दोघेजण झाडाखाली निवारासाठी म्हणून थांबायला गेले असता क्षणातच ही दुःखद घटना घडली. शेताकडे चक्कर मारावी म्हणून आपल शेत व वापलं की नाही ही मनामध्ये भीती सतावत होती.

शेत वापत आहे हे पाहण्यासाठी गेल्यानंतर अचानक पाऊस आला. पावसामुळे आंब्याच्या झाडाखाली थांबले आणि अचानक आकाशामध्ये वीज चमकली आणि काही क्षणांत दोघांवर काळाने घाला घातला. गुरुवारी दक्षिण शेंद या गावात दुःखाचा डोंगर कोसळला. सदरील दक्षिण शेंद हे देवणी पोलीस ठाण्याअंतर्गत येत असल्याने रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु होती. पुढील तपास पोलीस निरीक्षक सी.एस.कामठेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार आर.बी.साळुंके करीत आहेत.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 GT vs RR : १२ चेंडूंत ४ विकेट्स! रवी बिश्नोई, तुषार देशपांडेने गुजरातचा विजयाचा घास पळवला; राजस्थान Point Table मध्ये टॉपर

Strait of Hormuz: ''होर्मुजची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी ४८ तासांचा अल्टिमेटम, नाहीतर भीषण परिणाम...'' थेट इशारा

Solapur Awareness Ride: मंगळवेढ्यात महात्मा बसवेश्वर आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी जन्मभूमी ते कर्मभूमी सायकल यात्रा; जनजागृती उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद

विहीर रस्त्याच्या मधोमध, कठडा मोठा असता तर दुर्घटना टळली असती; CM फडणवीसांनी दुर्घटनेवर व्यक्त केलं दु:ख

विद्यार्थिनींसाठी आनंदाची बातमी! आता मुलींना दरमहा ५०० रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार, पण कोणाला? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT