file photo 
मराठवाडा

परभणी जिल्ह्यातील साळेगाव शिवारात वाघ..! 

सकाळ वृत्तसेवा


सेलू (जि. परभणी) : साळेगाव (ता. सेलू) शिवारात वाघ दिसल्याची चर्चा सोमवारी (ता. नऊ) सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली.


रायपूर (ता. सेलू) येथील वैभव गाडेकर त्यांचा मित्र हे सोमवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या आई - वडिलांना मोटारसायकलवरून गावाकडे घेऊन जात असताना साळेगाव शिवारात गट नंबर ५७ व ५८ या रस्त्यावर सायंकाळच्या सुमारास पट्टेदार वाघ दिसला असल्याने त्यांना धक्काच बसला. त्यांनी मोटारसायकल चालवून रायपूर अापले गाव गाठले.

या घटनास्थळी मतदारसंघाच्या आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्यासह तहसीलदार बालाजी शेवाळे यांनी पाहणी केली. मात्र, परिसारात अंधार पसरल्याने तो वाघ आहे का दुसरे काही, हे समजू शकले नाही. या वाघाच्या चर्चेमुळे साळेगाव, रायपूर, हातनूर येथील नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ग्रामस्थांमध्ये भीती

मागील काही दिवसांपूर्वी सेनगाव (ता. हिंगोली) शिवारात वाघ असल्याचा दुजोरा वनविभागाने दिला असल्याने अन्नाच्या शोधात वाघ परिसरात आला का? ही भीती ग्रामस्थांमध्ये निर्माण झाली आहे. मंगळवारी (ता. दहा) सकाळी वनविभागाचे पथक वाघाच्या पावलांचे ठस्से घेणार असून त्यानंतरच हे समजणार आहे की, हा नेमका वाघच आहे, का इतर दुसरा कुठला प्राणी? सध्या तरी या परिसरात भीतियुक्त वातावरण आहे.

शक्यता नाकारता येत नाही....

मागील काही दिवसांपासून तालुक्यातील वाई, बोथ, निरवाडी चारठाणा या परिसरातील शेतकऱ्यांनी परिसरात वाघ दिसल्याची माहिती दिली आहे. या माहितीनुसार हा वाघ या शिवारात भ्रमण करीत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, वनविभागाच्या ठस्सेतज्ज्ञांच्या अहवालानुसार हा प्राणी नेमका कोणता हे समजू शकेल, असे तहसीलदार बालाजी शेवाळे यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant Returns : तब्बल 400 दिवसांनंतर 'माधुरी' परतली! मध्यरात्री 12.40 वाजता 1160 किमीचा प्रवास करून पोहोचली नांदणीत; उपस्थितांना आनंदाश्रू अनावर

Pimpri News : नोकरीपेक्षा आपला व्यवसायच बरा! दोन लाख ४९ हजार जण उद्योग-व्यवसायाकडे वळले

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Italian Style Aloo Paratha: आलू पराठ्याला द्या 'हा' इटालियन ट्विस्ट! चव अशी की रोज हाच पराठा मागाल

आजचे राशिभविष्य - 12 सप्टेंबर 2026

SCROLL FOR NEXT