nawardev 
मराठवाडा

साखरपुडा झाला अन् अंगाला लागली हळद,अक्षता पडायच्या आधी नवरदेव हुंडा घेऊन पळाला

सकाळ वृत्तसेवा

गिरगाव (जि. हिंगोली) : लग्नाच्या एक दिवस अगोदर लग्नाला नकार देऊन नवरदेव फरार झाल्याची घटना घडली आहे. मुलगी पंसत नाही म्‍हणत लग्नास नकार देणाऱ्या नवरदेवासह त्‍याच्या आई-वडिलांवर कुरुंदा पोलिस ठाण्यात सोमवारी (ता. दोन) गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वसमत तालुक्यातील सुकळी येथील मुलीचा विवाह ढोलक्याची वाडी (ता. कळमनुरी) येथील संदीप पाचपुते याच्यासोबत ठरला होता. तसेच यासाठी एक लाख ७५ हजार रुपये, पाच ग्रॅमची अंगठी, कपडे आदी वस्‍तू देण्याचे ठरले होते. त्‍यांनतर डिसेंबर महिन्यात सुकळी येथे साखरपुडादेखील झाला. या वेळी वधू - वराकडील पाहुणे मंडळी, गावकरी सहभागी झाले होते. 

मुलगी पसंत नसल्याचे कारण

साखरपुड्यात ठरलेली रक्‍कम तसेच अंगठी देण्यात आली. तसेच नवीन कपडेदेखील नवरदेवाला देण्यात आले. त्‍यानंतर मार्च महिन्यात (ता. तीन) विवाहाचा मुहूर्तदेखील ठरला. त्‍याप्रमाणे वधू मंडळीकडून संपूर्ण तयारी करण्यात आली. लग्नपत्रिका नातेवाइकांना वाटप करण्यात आल्या. लग्नाची तिथी जवळ आली. परंतु, लग्नाच्या एक दिवस अगोदर सोमवारी (ता. दोन) नवदेवाचे वडील शिवप्रसाद पाचपुते यांनी नवरदेवास मुलगी पसंत नसल्याचे सांगून तो लग्नास तयार नसल्याचे वधूकडील मंडळीस सांगितले. त्यामुळे वधू पित्याला मोठा धक्काच बसला. लग्नाची संपूर्ण तयारी झाली, पाहुणे मंडळीदेखील घरी आले. 

कुरुंदा पोलिस ठाण्यात गुन्हा

मात्र, नवरदेवाकडून लग्नास नकार आल्याने पाहुणे मंडळींनीही संताप व्यक्त केला. याप्रकरणी रामभाऊ चौरे यांच्या फिर्यादीवरून नवरदेव संदीप पाचपुते, वडील शिवप्रसाद पाचपुते, आई उषा पाचपुते यांच्या विरोधात कुंरुदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, गुन्हा दाखल होताच नवरदेवासह त्‍याचे आई-वडील पसार झाले आहेत. कुरुंदा पोलिसांनी नवदेवासह नवरदेवाच्या आई - वडिलांच्या अटकेसाठी वसमत येथील न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले असून न्यायालयाच्या परवानगीनंतर त्‍यांना अटक केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

मटका जुगाराचे २३ हजार रुपये जप्त

आखाडा बाळापूर : येथील मिलन चौकाजवळ असलेल्या लाकडाच्या आरामशीनजवळ मंगळवारी (ता.तीन) आखाडा बाळापूर येथील शेख ताहेर शेख महेबूब, शंकर आनंदराव मिरासे, रवी ऊर्फ पंडित राऊत हे कल्याण नावाचा मटका खेळवित होता. तसेच आंबादास धोतरे हा मटका खेळताना मिळून आला. त्‍यांच्या ताब्यातील जुगाराचे साहित्य व नगदी २३ हजार ५४० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. पोलिस कर्मचारी रवी हुंडेकर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gudipadwa Holiday: गुढीपाडव्याला बँका आणि शेअर बाजार बंद की सुरू? जाणून घ्या RBI आणि NSE ची अधिकृत माहिती

पुण्याची बातच न्यारी! मृणाल ठाकूरने पुण्यात येताच केली 'ही' गोष्ट, खास मराठी पोस्ट करत म्हणाली... 'पुण्यात आलो आणि...'

Latest Marathi News Live Update : अंबाबाई मंदिर गाभारा संवर्धन पूर्ण; आजपासून दर्शन सुरू

Indore Fire Accident : इमारतीला भीषण आग, ७ जणांचा होरपळून मृत्यू; इलेक्ट्रिक कार चार्जिंग करताना शॉर्टसर्किटमुळे दुर्घटना

Dhangar Community: मेंढपाळ धनगरांसाठी अर्धबंदिस्त मेंढीपालन प्रकल्पाचे संकेत; कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक!

SCROLL FOR NEXT