Ambajogai Accident News sakal
मराठवाडा

Ambajogai Accident News : बहीण-भावासह चिमुकलीचा बस-दुचाकी धडकेत मृत्यू ; अंबाजाेगाई तालुक्यातील घटना

बसने दुचाकीला दिलेल्या धडकेत बहीण, भाऊ व चिमुकल्या भाचीचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना अंबाजोगाई - लातूर मार्गावरील वाघाळा फाट्यावर रविवारी सायंकाळी घडली.

सकाळ वृत्तसेवा

अंबाजोगाई : बसने दुचाकीला दिलेल्या धडकेत बहीण, भाऊ व चिमुकल्या भाचीचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना अंबाजोगाई - लातूर मार्गावरील वाघाळा फाट्यावर रविवारी सायंकाळी घडली.

बिटरगाव तांडा (ता. रेणापूर) येथील सेवालाल पंडित राठोड (वय २१) याचा २८ एप्रिलला विवाह होणार होता. लग्नाचाच बस्ता बांधण्यासाठी सेवालाल हा त्याची राडी तांडा (ता. अंबाजोगाई) येथील बहीण दीपाली सुनील जाधव (वय २०) आणि एक वर्षाची भाची त्रिशा यांना घेऊन दुचाकीने अंबाजोगाईला आला होता.

गावाकडे परतत असताना लातूर- छत्रपती संभाजीनगर बसने (एमएच- २४, एयू- ७७१८) दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात सेवालाल, दीपाली आणि त्रिशा यांचा जागीच मृत्यू झाला. सेवालाल आणि दीपाली हे त्यांच्या मातापित्यांचे एकुलते होते.

अपघाताची माहिती मिळताच नातेवाइकांनी स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात धाव घेऊन आक्रोश केला होता. सेवालालचे लग्न महिन्यावरच आलेले असताना काळाने त्याच्यावर झडप घातली. या दुर्घटनेमुळे कुटुंबावर शाेककळा परसली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT