Rape case news esakal
मराठवाडा

अल्पवयीन मूलीस दूचाकीवर नेवून अत्याचार

दोघांविरूद्ध गून्हा दाखल ; घटनेने सेलूत खळबळ

सकाळ डिजिटल टीम

सेलू : शहरातील दहा वर्षीय मूलीस व तिच्या मावस भावास दूचाकीवर पळवून नेत मूलीवर अत्याचार केल्याची घटना सोमवारी (ता.०५) रोजी दूपारच्या सुमारास घडली. सदरील घटनेत दोन आरोपी विरोधात सेलू पोलिसात गून्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान सिसिटिव्ही फूटेजमध्ये मूलीस आरोपी पळवून नेत असल्याचे दिसून येत आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार दोन अनोळखी आरोपींनी, संगनमत करत सोमवारी सकाळी अकरा वाजता शहरातील विद्यानगर येथून एका दहा वर्ष दहा महिने वय असलेल्या मूलीस व तिचा दहा वर्षाचा मावस भावास दोन अज्ञात व्यक्तीने बळजबरिने पळवून नेले. तिच्या मावस भावास वालूर मार्ग कौसडी फाटा येथे रस्त्यावर सोडून दिले व मूलीस कोक शिवारात नेवून अत्याचार केला.

या प्रकरणी पिढीतेच्या आईने सेलू पोलीसात रात्री उशिरा फिर्याद दिल्यानंतर सेलू पोलीस ठाण्यात गून्हा दाखल करण्यात आला. दरम्यान सेलू येथे पोलीस अधिक्षक जयंत मिना, अप्पर पोलीस अधिक्षक सूदर्शन मोकमा, उपविभागीय पोलीस अधिकारी अविनाश कुमार यांनी रात्री उशिरा भेट देवून तपासाची सूत्रे फिरवली आहेत. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक भाग्यश्री पूरी या करत आहेत

सिसिटिव्हीमध्ये दूचाकीस्वार कैद

या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यासाठी पोलीसांनी तपास सूरू केला असून या मार्गावरील सिसिटिव्ही फूटेज तपासले जात आहेत. यात एका दूचाकीवरून आरोपी हे मूली व मूलास दूचाकीवरून नेत असल्याचे दिसत आहे. दोन्ही आरोपींनी कपड्यांनी तोंड झाकले असून एकाचे शर्ट पिवळा तर दूसर्‍याचा लाल रंगाचा शर्ट दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

स्कॉर्पिओला आग लागून एकाच कुटुंबातील चौघांचा अंत, मृतांमध्ये ZP सदस्यासह २ माजी सरपंचाचा समावेश

Latest Marathi News Live Update : मनोज जरांगेंची पत्रकार परिषद! 30 मे पासून आमरण उपोषण

Badlapur Crime: बदलापुरात वडिलांच्या मित्रानेच १६ वर्षीय मुलीचा केला विनयभंग, मोबाईल चार्जिंगसाठी घरी आला अन्...

Deepali Sayyad Claims : ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’वरून खळबळ! दिपाली सय्यदला धमक्या, “ते नाव घेतलं तर सर्व काही संपेल...”

Kolhapur Student Death Case : बाबा दुप्पट फायदा मिळणार आहेत, पैसे पाठवा..., मुलीचे शेवटचे शब्द, कुटुंबीयांनी नाकारलं विद्यार्थिनीने नको ते केलं

SCROLL FOR NEXT