aundha photo
aundha photo 
मराठवाडा

येथेही पर्यटक करतात गर्दी

कृष्णा ऋषी

औंढा नागनाथ (जि. हिंगोली): येथील वन विभागाच्या वनपर्यटन परिसरात अटल आनंदवन व घन वन साकार होत आहे. यात एका हेक्‍टरमध्ये तब्बल तीस हजार विविध प्रजातींची रोपे लावण्यात आली असून ही रोपे वाढीस लागली आहेत. त्यामुळे हा परिसर हिरवळीने नटला आहे. त्यामुळे पर्यटकही येथे गर्दी करत आहेत. 

औंढा नागनाथ वन परिक्षेत्रांतर्गत वन विभागाच्या वतीने गोकर्णेश्वर माळरान परिसरात ५० हेक्टरवर वनपर्यटन साकारण्यात येत आहे. त्यानुसार वन विभागाच्या वतीने विविध औषधी प्रजातींची रोपटे लावण्यात आली. या परिसरात पर्यटनासाठी म्हणून राशी नक्षत्र उद्यान, वनौषधी उद्यान, लिंबवन, बालोद्यान, पॅगोडा, मनोरे व्हिव पॉइंट तयार करण्यात आले आहेत. येथे दररोज शेकडो पर्यटक भेटी देत आहेत. सुटीच्या दिवशी तर मोठी गर्दी होत आहे.

विविध प्रजातींची तीस हजार रोपे

 येथील अटल आनंदवन व घनवन हा प्रकल्प तयार करून रोपे विकसित करण्यात येत आहेत. डॉ. आकिरा मियावाली या वनस्पती पर्यावरण शास्त्रज्ञ यांच्या पीएनव्ही या संकल्पनेवर हा प्रकल्प नव्यानेच विकसित करण्यात येत आहे. एक हेक्‍टरवर तीस हजार विविध प्रजातींची रोपे लावण्यात आली असून यात जांभूळ, चिंच, कांचन, खैर, बदाम, मोगरा, बकूळ, गणेरी, सीताफळ, आंबा, करंज, कवठा, लिंब, चाफा, बांबू, पिंपळ आदी वृक्षांचा समावेश आहे.

पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार

या रोपांची लागवड करून त्याची निगा राखण्यात येत आहे. त्यामुळे तीस टक्के जास्त ऑक्सिजन तयार होतो. जमिनीतील सेंद्रिय कार्बनचे प्रमाण वाढते, तसेच २५ ते ३० टक्के अधिक कार्बनडाय ऑक्‍साईड शोषला जातो. तापमानात दोन ते पाच डिग्री सेल्सिअस तापमान कमी होते, असे सांगितले जात आहे. बहुपयोगी वन औंढ्यात साकारत असल्याने भविष्यात पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. येथे बाराही महिने रोपवाटिकेत वेगवेगळ्या प्रजातींची रोपे तयार करण्यात येतात. त्याचे काम वनपाल जयश्री बरगे हे पाहत आहेत.

सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज

येथे नागनाथ ज्योतीर्लिंगाचे देवस्थान आहे. त्यामुळे देशभरातून भाविक दर्शनासाठी येतात. परिसरात उंच टेकड्या असून तलाव, उद्यानही आहे. भाविक विसावा म्हणून उद्यानात थांबतात. तसेच बोटींगचाही आनंद लुटतात. मात्र, भाविक, पर्यटकांना विविध गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. पर्यटन विभागाने सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. 
 
वन विभागातर्फे साकारतय उद्यान

वन विभागातर्फे साकारत असलेल्या आनंदवनात विविध प्रजातींची झाडे लावण्यात आली आहेत. एका एकरमध्ये तीस हजार झाडे लावली आहेत. हे पाहण्यासाठी येथे सुटीच्या दिवशी पर्यटकांची गर्दी होत आहे.
-माधव केंद्रे, वनपरिक्षेत्राधिकारी

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT