crime 
मराठवाडा

फिल्मी स्टाईलने पाठलाग करून महसूल पथकाने पकडले अवैध वाळूचे ट्रॅक्टर

राजेश दारव्हेकर

हिंगोली : तालुक्यातील खरबी वरून अंधारवाडी परिसरात अवैध गौण खनिज व चोरटी वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला महसूल पथकाने सिने स्टाईलने  पाठलाग करून पकडले आहे. त्यावेळी वाळू माफियांनी महसूल पथकावर हल्ला करून दुचाकीचे पाच हजार रुपयांचे नुकसान केल्याची घटना शनिवारी (ता.५) पहाटे दोनच्या सुमारास अंधारवाडी येथे घडल्याने चौघांवर हिंगोली ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

जिल्ह्यात वाळूघाटाचे लिलाव प्रक्रिया ठप्प झाल्याने वाळू माफिया सक्रिय झाली आहे. शासनाचा महसूल बुडवून रात्री, अपरात्री वाळूची चोरटी वाहतूक करीत असल्याची माहिती महसूल पथकाला मिळाली आहे. त्यानुसार उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, तहसीलदार गजानन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार मयूर खेंगळे, तलाठी प्रदीप सोसे, हर्षवर्धन गवई, रवी इंगोले, मंडळ अधिकारी पारीस्कर, बाळू नागरे या पथकाने खरबी गावाकडे जात असताना अवेध्य वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर क्रमांक एम. एच.३८ बी, ५१५७ व लाल रंगाची ट्राली या चालक मालकाने पथकास पाहून अंधारवाडीकडे पळून जात होते. त्यावेळी पथकाने त्या ट्रॅक्टरचा सिने स्टाईल पाठलाग करून अंधारवाडी जवळ असलेल्या पिंपळाच्या झाडाजवळ त्यांना पकडले असता आरोपी गंगाधर बोचरे, शेख अखिल, देविदास कोरडे, भानुदास कोरडे यांनी महसूल पथकावर हल्ला केला. तसेच पथकातील फिर्यादीच्या दुचाकीचे नुकसान केले .

यावेळी मयूर खेंगले यांनी तातडीने अतुल चोरमारे यांना वाळू माफियांनी पथकावर हल्ला केला असल्याची माहिती दिली. त्यानंतर तातडीने घटनास्थळी पोलीस दाखल झाल्याने मोठा अनर्थ टळला, वाळू माफिया पथकावर ट्रॅक्टर अंगावर घालण्याचा प्रयत्न करीत होते. तलाठी हर्षवर्धन गवई यांच्या फिर्यादी वरून हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात शनिवारी पहाटे दोनच्या सुमारास चौघांवर गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे हे करीत आहेत.

संपादन - सुस्मिता वडतिले  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara fraud Case: तमिळनाडूच्या महिलेची साताऱ्यात फसवणूक; १२ लाख अन् सात ताेळे साेने, परस्‍पर विक्री, विश्वास नडला, नेमकं काय घडलं!

Paithan News: जायकवाडी धरणाचा वीजपुरवठा अखेर पूर्ववत ; नाथसागर धरण अंधारात

US Iran Conflict : डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; इराणवरील हल्ले १० दिवसांसाठी थांबवले, मध्यपूर्वेतील तणाव होणार कमी?

मोठी बातमी! जमिनीच्या प्रत्येक पोटहिश्श्याची मोजणी आता 200 रुपयांत होणार; महसूल विभागाचा निर्णय, 7/12 उताऱ्यावरील सर्वांच्या संमतीची अट, वाचा...

आजचे राशिभविष्य - 27 मार्च 2026

SCROLL FOR NEXT