Traders Shops Chakur News  
मराठवाडा

दुकानांचे शटर तोडून लाखो रुपयांची चोरी, चाकूर येथील घटना

प्रशांत शेटे

चाकुर (जि.लातूर) ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील नऊ आडत दुकानांचे शटर तोडून अज्ञात चोरट्यांनी लाखो रूपये लंपास केल्याची घटना शनिवारी (ता.२२) घडली. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात जवळपास २५ आडत दुकाने आहेत. शुक्रवारी (ता.२१) रात्री दुकाने बंद करून व्यापारी घराकडे गेले होते.

शनिवारी पहाटे सहाच्या सुमारास एका दुकानातील मुनीम दुकानाकडे आला असता त्याला काही दुकानांची शटर तोडल्याचे निदर्शनास आले. यामुळे त्यांनी याची माहिती व्यापाऱ्यांना दिली. चोरट्यांनी लोखंडी रॉडच्या साहाय्याने शटर वाकवून दुकानात प्रवेश केला करुन कपाटातील रोख रक्कम लंपास केली. आप्पासाहेब पाटील, संजय पाटील, शिवशंकर हाळे, हणमंत इंद्राळे, प्रशांत केंद्रे, समाधान डोंगरे, प्रदीप उस्तुर्गे, शंकर कोईलवाड, सुभाष नागरगोजे यांच्या दुकानांची शटर तोडण्यात आली आहेत. काही दुकानांत व्यापाऱ्यांची लाखो रूपयाची रक्कम असल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनास्थळी पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण, रामचंद्र गुंडरे, तानाजी आरदवाड, दत्ता थोरमोटे यांनी भेट देऊन पंचनामा केला असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.
हेही वाचा‘हे’ कर्मचारी वेतन आयोगापासून वंचितच : कोणते ते वाचलेच पाहिजे


विहिरीमध्ये पडून पिता-पुत्राचा मृत्यू
उदगीर  : विहिरीत पडल्याने पिता-पुत्राचा मृत्यू झाल्याची घटना शहरालगतच्या निडेबन शिवारात गुरुवारी (ता. २१) रात्री अकराच्या सुमारास घडली. ग्रामीण पोलिस ठाण्यात रात्री उशिरा आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद झाली.


ग्रामीण पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः मोलमजुरी करणारे निडेबन येथील मारुती गंगाराम मामुलवार त्यांचे पुत्र बालाजी मारुती मामुलवार, गंगाधर मारुती मामुलवार यांनी काल रात्री नऊच्या सुमारास निडेबन शिवारात राजकुमार रंगवाळ यांच्या विहिरीच्या काठावर बसून दारू पिली. त्यानंतर तोल जाऊन बालाजी मारुती मामुलवार विहिरीत पडला. त्याला वाचविण्यासाठी मारुती गंगाराम मामुलवार यांनी विहिरीत उडी मारली. या दोघांनाही वाचविण्यासाठी गंगाधरनेही विहिरीत उडी घेतली; परंतु वडील व भावाला वाचविण्यात त्याला यश आले नाही. मारुती मामुलवार (वय ५८) व बालाजी मामुलवार (२०) यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. रात्री उशिरा त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. शासकीय रुग्णालयात आज दुपारी उत्तरीय तपासणीनंतर दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. निडेबनचे पोलिस पाटील मधुकर रंगवाळ यांच्या फिर्यादीवरून पोलिसांत आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT