hin27RDp02 
मराठवाडा

‘कोरोना’ जनजागृतीसाठी अंगणवाडी सेविकांना ‘झूम’ ॲपद्वारे प्रशिक्षण, कुठे ते वाचा...

सकाळ वृत्तसेवा

हिंगोली ः जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांना झूम ॲपवरून कोविड-१९ बाबत ऑनलाइन प्रशिक्षण दिले आत असून त्‍यातील माहिती घरोघरी जाऊन दिली जात आहे. 

‘कोरोना’ विषाणूच्या प्रादुर्भावाने सर्वत्र थैमान घातले असताना ‘कोरोना’ आजाराचे रुग्ण आढळत आहेत. अंगणवाडी सेविका, आशा वर्कर या ग्रामीण व शहरी भागात सर्वत्र घरोघरी जाऊन सर्वेक्षण करीत आहेत. त्या बाबत जनजागृतीदेखील केली जात आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविकांनी ही कामे करीत असताना काय काळजी घेतली पाहिजे, या बाबत केंद्र शासनाच्या आरोग्य विभागातर्फे झूम ॲपवरून प्रशिक्षण दिले जात आहे. 

एक हजार ८९ अंगणवाड्यांतील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण 
जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी सेविकांनी हे प्रशिक्षण घेतले आहे. या प्रशिक्षणामुळे त्यांना सर्वेक्षण व कामकाज करताना स्वतःची काळजी कशी घ्यावी याची माहिती मिळाली. गावपातळीवर अंगणवाडी ताईंसह आशा वर्कर, ग्रामपंचायतचे कर्मचारी एका टीममार्फत काम केले जात आहे. यात अंगणवाडी ताई या मुख्य घटक असल्याने त्‍यांना या बाबत माहिती देण्यासाठी जिल्‍ह्यात एक हजार ८९ अंगणवाड्यांत कार्यरत असलेल्या अंगणवाडी ताईंसाठी या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्‍यान, घरोघरी जनजागृतीसाठी जाताना काय काळजी घ्यावी यासाठी या प्रशिक्षणाचे आयोजन झूम ॲपच्या माध्यमातून करण्यात आले होते. 

प्रशिक्षणात केल्या सूचना 
सर्वच अंगणवाडीताई सहभागी झाल्याने त्‍यांना काय काळजी घ्यावी याची माहिती मिळाली आहे. घरोघरी जाताना तोंडाला मास्‍क लावला जावा, हातात ग्लोज वापरावेत तसेच सॅनिटायझरचादेखील वापर करावा. माहिती देताना एक मिटरचे अंतर ठेवूनच माहिती द्यावी, अशा सूचना त्‍यांना या ॲपद्वारे देण्यात आल्या आहेत. सध्या ‘कोरोना’ विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउनमुळे एकत्र येऊन प्रशिक्षण देणे बंद असल्याने घरीच थांबून माहिती तंत्रज्ञानाचा वापर करीत हा प्रयोग केला जात आहे त्‍याचा लाभदेखील सर्वांना होत आहे. यामुळे या प्रशिक्षणाला आता महत्त्वदेखील आहे. 

यांनी घेतला पुढाकार 
हे प्रशिक्षण हिंगोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले. प्रशिक्षणासाठी जिल्‍हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजीराव पवार, बालकल्याणचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ, डॉ. जायभाये, सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी, सर्व पर्यवेक्षिका यांनी पुढाकार घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT