file photo 
मराठवाडा

परभणी येथून प्रथमच रेल्वे मालगाडीने सोयाबीनची वाहतूक; बिजनेस डेवलोपमेन्ट युनिटच्या प्रयत्नांना यश 

गणेश पांडे

परभणी : दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील परभणी येथून प्रथमच सोयाबीन सीड्सची रेल्वेने मालवाहतूक करण्यात आली. विभागीय व्यवस्थापक उपिंदर सिंघ यांनी बनवलेल्या बिजनेस डेवलोपमेन्ट युनिट (बी.डी.यु.) ला छान यश प्राप्त होत आहे. नगरसोल येथून किसान रेल्वेने कांदा आणि द्राक्षे देशभरात पाठविण्यात येत आहेतच. त्यात ता. १५ मार्च रोजी परभणी येथून ४२ बी.सी.एन. वेगन्स मधून २६६१ टन सोयाबीन सीड्स गुजरात येथील गांधीधाम येथे पाठविण्यात आले आहेत. 

मराठवाड्यात सोयाबीनचे पिक खूप मोठ्या प्रमाणात घेण्यात येते. या सोयाबीन ची वाहतूक आत्तापर्यंत ट्रक, टेम्पोने जवळपासच्या शहरात तसेच विदर्भात केली जाते. काल परभणी येथून गांधीधाम, गुजरात येथे सोयाबीन गेल्यामुळे येथील शेतकऱ्यांना त्यांचा माल विविध राज्यांत तसेच परदेशात ही पाठविण्याची संधी प्राप्त झाली आहे. 

भारतीय रेल्वेने आता मालवाहतूक वाढविण्यावर खूप अधिक जोर दिला आहे. माल रेल्वे डब्यांमध्ये चढविण्यापासून तो माल उतरविण्यापर्यंत पाठपुरावा केला जात आहे. ज्यामुळे मालवाहतूक अधिक वेगाने आणि सुरक्षित पणे होत आहे. त्यातच नव्यानेच गठीत केलेल्या बिजनेस डेवलोपमेन्ट युनिट (बी.डी.यु.) चे अधिकारी विविध क्षेत्रातील व्यापारी, उद्योजक, शेतकरी यांच्या भेटी घेवून त्यांना रेल्वेने माल वाहतूक केल्यास त्यांचा माल वेगाने, सुरक्षित आणि कमी खर्चात कसा पोहोचविला जाईल याचे महत्व पटवून देत आहेत. 

दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक गजानन माल्या यांनी नांदेड विभागातील अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी मालवाहतूक वाढविण्याकरिता करत असलेल्या प्रयत्नाबद्दल त्यांचे अभिनंदन केले.  श्री माल्या यांनी शेतकरी, व्यापारी आणि उद्योजक यांना आवाहन केले आहे की त्यांनी रेल्वे तर्फे दिल्या जाणाऱ्या  विशेष सवलती, संधी आणि सुविधा वापरुन आपला व्यवसाय वृद्धिंगत करावा. तसेच नांदेड विभागातून पर्यायाने दक्षिण मध्य रेल्वेमध्ये मालवाहतूक वाढवण्यात  हातभार लावावा.  

संपादन- प्रल्हाद कांबळे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shirur fake tiger scare: कोंढापुरीत एआयच्या मदतीने बनावट वाघाचा फोटो, अफवा पसरवणाऱ्या युवकाला वनविभागाची समज

Palghar Relief Hospital case: रिलीफ रुग्णालय राडा प्रकरणात कुंदन संखे यांच्यासह २२ जणांना न्यायालयीन कोठडी; पोलिसांची अतिरिक्त पोलीस कोठडीची मागणी फेटाळली

Sugar Factory Membership: कार्यक्षेत्राबाहेरील ऊस उत्पादकांना सभासदत्व बंद; साखर आयुक्तांच्या परिपत्रकामुळे भीमाशंकर कारखान्याच्या प्रस्तावाला ब्रेक

MNLU Nagpur VC Appointment: डॉ. ज्योती भाकरे यांची नागपूरच्या 'महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी'च्या (MNLU) कुलगुरूपदी निवड

राहुल द्रविडच्या पोराची २११ च्या स्ट्राईक रेटने फटकेबाजी,ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची धुलाई! आर्यवीर सेहवागच्या पदार्पणात २८ धावा

SCROLL FOR NEXT