जालन्यात अंबड चौफुलीत ट्रॅव्हल बसने जीप धडक दिली.
जालन्यात अंबड चौफुलीत ट्रॅव्हल बसने जीप धडक दिली.  सकाळ
मराठवाडा

ट्रॅव्हलची जीपला जोरदार धडक; जालन्यात एक ठार, तर आठ जखमी

उमेश वाघमारे

सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील चांदस येथील नऊ जण क्रुझर जीपने रामनगर साखर कारखाना येथे लग्नकार्यासाठी निघाले होते.

जालना : शहरातील Jalna अंबड चौफुली येथे रविवारी (ता.१३) ट्रॅव्हल व जीपचा भीषण अपघात झाला. यात एक महिला ठार, तर आठ प्रवासी जखमी झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील चांदस येथील नऊ जण क्रुझर जीपने रामनगर साखर कारखाना येथे लग्नकार्यासाठी निघाले होते. रविवारी पहाटे अंबड चौफुली येथे या जीपला यवतमाळ Yavatmalयेथून मुंबईकडे Mumbai निघालेल्या ट्रॅव्हलने जोरदार धडक दिली. त्यामुळे जीप रस्त्याच्या कडेला तीन वेळा पलटी खात कोसळली. तसेच, ट्रॅव्हलच्या समोरचा भाग पूर्णपणे चेंदामेंदा झाला आहे. या अपघातात जीपमधील एक महिला प्रवासी जागीच ठार झाली. स्वाती आदिनाथ काळे (रा.बेंबळे ता.माढा जि. सोलापूर) Solapurअसे या मृत महिलेचे नाव आहे. तर आठ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. Travel Bus Hit Jeep, Woman Died And Eight Injured In Jalna

जीपमधील जखमीवर जिल्हा रुग्णालय व एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती कळताच कदीम जालना पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक श्री. टाक यांच्यासह पोलिस कर्मचारी दीपक दाभाडे, राजू साळवे, उमेश साबळे, गजानन काकडे यांच्यासह परिसरातील नागरिकांनी घटनास्थळ गाठून जखमींना मदत केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT