Aurangabad Gramin News
Aurangabad Gramin News 
मराठवाडा

'लालपरी'चा प्रवास झाला डोकेदुखी, खड्ड्यांमुळे प्रवासी वैतागले

सकाळ वृत्तसेवा

फुलंब्री (जि.औरंगाबाद) : येथील आगारातून ग्रामीण भागात जाणाऱ्या बसचा प्रवास खड्डेमय रस्त्यांमुळे प्रवाशांना त्रासदायक ठरत आहे, औरंगाबाद-जळगाव या मार्गावर मोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांसह प्रवासी वैतागले आहेत. औरंगाबाद-जळगाव या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणे जिकिरीचे ठरत आहे.


औरंगाबाद, सिल्लोड आगारातून किंवा जळगाव, जामनेर आगारांमधून या मार्गावर धावणाऱ्या अनेक बस खिळखिळ्या झाल्या आहेत. बसच्या खिडक्‍यांच्या तावदानांचा खडखडाट, खड्ड्यांमुळे प्रवाशांची डोकेदुखी ठरू लागला आहे. बहुतांश बसचे पत्रे तुटलेले आहेत. त्यामुळे अशा भंगार वाहनांचा प्रवास नको रे बाबा, असे म्हणण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे. राज्य परिवहन मंडळाच्या बसचे टायर खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे. रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे केवळ वाहनेच नाही तर या वाहनांमधून नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांची हाडे देखील खिळखिळी होऊ लागल्याचे प्रवासी सांगत आहेत. या प्रकारामुळे घरगुती वाहनांमधून प्रवास करणारे अनेक प्रवासी औरंगाबाद-जळगाव आदी भागांत जाण्याकरिता मार्ग बदलून जात आहेत.


जुनाट वाहने रस्त्यावर
औरंगाबाद-जळगाव या महामार्गावर वेगवेगळ्या आगारांमध्ये जुनाट झालेली वाहने वापरली जात आहेत. जुन्या वाहनांची दुरुस्ती करून ती पुन्हा रस्त्यावर आणली जातात. जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील सर्वच रस्त्यांवर खड्डे व रस्तानिर्मितीच्या कामामुळे झालेली दुरवस्था पाहता त्या रस्त्यांवरून गाडी चालवण्याची इच्छा होत नाही; पण नाइलाजास्तव अशा बस आम्हाला चालवाव्या लागतात, अशा प्रतिक्रिया एसटीच्या चालकांनी नाव न घेण्याच्या अटीवर व्यक्त केल्या.

हेही वाचा - मारु नका, सर्व देताे, चाेरट्यांना विनंती

इंधनाची बचत नाही
परिवहन मंडळाकडून इंधन बचतीचा मंत्र वारंवार देण्यात येतो. आम्हीसुद्धा तसा प्रयत्न करीत असतो; पण जिल्ह्यातील ग्रामीण भागातल्या रस्त्यांची अवस्था इंधन बचतीच्या कार्याला अडथळा ठरली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहतुकीवर इंधन खर्ची पडत असल्याचे परिवहन महामंडळाचे चालक खासगीत सांगत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वैवाहिक संबंध नाकारणे, मुलांची जबाबदारी न घेणे मानसिक क्रूरता; दिल्ली हायकोर्टाची टिप्पणी

Mahadev Betting App: महादेव बेटींग अ‍ॅप प्रकरणी आणखी एका अभिनेत्याला अटक

IPL 2024: ईशान किशनला BCCI चा दणका, दिल्ली-मुंबई सामन्यानंतर केली मोठी कारवाई

Antarctica Penguin : ग्लोबल वॉर्मिंगमुळे नष्ट होतायत अंटार्क्टिकावरील पेंग्विन; बर्फ वितळल्यामुळे लाखो नवजात पेंग्विन्सचा मृत्यू

Iraq: इराकमध्ये समलैंगिक संबंधाना गुन्हा ठरवणारा कायदा मंजूर; तब्बल इतक्या वर्षांचा होणार तुरुंगवास

SCROLL FOR NEXT