gad 
मराठवाडा

गड ते पायथ्यावरील झाडे जगवण्यासाठीची वृक्षप्रेमींची धडपड, कशी आणि कुठे ते वाचा... 

सकाळ वृत्तसेवा

कुरुंदा ः वसमत तालुक्‍यातील कुरुंदा येथून जवळच असलेल्या टोकाईदेवीच्या गडाच्या मंदिर ते पायथा अशी दोनशे वृक्षांची लागवड मागच्या वर्षी सामाजिक वनिकरणातर्फे गाजावाजा करुन रस्त्याच्या दुतर्फा हजारो वृक्ष लागवड केली होती. मात्र, पाण्याअभावी ही झाडे सुकू लागली होती. सह्याद्री देवराई स्वंयसेवी संघटनेच्या वृक्षप्रेमींकडून आतापर्यंत पाणी उपलब्ध करुन ही लावलेली झाडे जगवली. त्‍यानंतर सामाजिक वनिकरणातर्फे या वृक्षांना आता टँकरद्वारे पाणीपुरवठा देणे सुरू केले आहे. 


कुरुंदा गावापासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर उंच माळावर देवीचे मंदिर आहे. त्‍याला टोकाईदेवी असे नाव आहे. हे मंदिर परिसरातील अनेक गावातील भाविकांचे श्रध्दास्‍थान आहे. येथे नवरात्रात नऊ दिवस धार्मिक कार्यक्रम असतात. परिसरातील गावातील भावीक येथे पायी चालत येतात. नऊ दिवस होणाऱ्या कार्यक्रमात भाविकांची संख्या मोठी असते तसेच येथे यात्रा महोत्‍सव देखील असतो. मागच्या काही दिवसांपूर्वी कुरुंदा येथील युवकांनी एक ग्रुप तयार करून येथे वृक्षारोपण केले. 

दोनशे झाडांपैकी पन्नास झाडे वाळुन गेली
सामाजिक वनिकरणातर्फे देखील येथे मागच्या वर्षी मंदिर ते पायथा अशी दोनशे वृक्ष लावण्यात आली. काही दिवस त्‍याची देखभाल करण्यात आली. मात्र, निधीअभावी पाणी देण्यासाठी लावण्यात आलेल्या कर्मचाऱ्याला ठरवून दिलेले मानधन मिळत नसल्याने येथे पाणी देणे बंद झाले. यामुळे येथे लावण्यात आलेली झाडे सुकू लागली. ही माहिती वृक्षप्रेमी मंडळाला कळल्यानंतर त्‍यांनी ही झाडे जगविण्यासाठी संबंधितांना माहिती दिली. मात्र, संबंधित विभागाचे याकडे दुर्लक्ष झाल्याने पाण्याअभावी या दोनशे झाडांपैकी पन्नास झाडे वाळुन गेली. 

झाडांना पाणी देण्यासाठी टँकर
झाडामुळे शोभिवंत दिसणारा हा परिसर रखरख दिसत होता. त्‍यानंतर सह्याद्री देवराई व सयाजी शिंदे मित्र मंडळाने सह्याद्री देवराई मित्रमंडळाचे श्री.निंबाळकर यांनी सामाजिक वनीकरण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून सुकून जात असलेल्या झाडा़बाबत माहिती दिली व ही झाडे जगविण्याची गरज असल्याची माहिती त्‍यांना दिली व पाणी देण्याची विनंती केली. त्‍यानंतर रविवारी (ता.२६) सामाजिक वनिकरणाच्या श्रीमती पाटील यांनी याकडे लक्ष देवून झाडांना पाणी देण्यासाठी टँकर व कर्मचारी पाठवले व वृक्षांना पाणी देणे सुरु केले आहे. 

वृक्षप्रेमी मंडळातून समाधान
आता यापुढे या झाडांना नियमित पाणी दिले जाणार असल्याचे श्रीमती पाटील यांनी सांगितले. यामुळे वृक्षप्रेमी मंडळातून समाधान व्यक्‍त होत आहे. तसेच कुरुंदा व परिसरातील नागरिक देखील या निर्णयामुळे समाधानी झाले आहेत. एकदा वृक्षारोपण केल्यानंतर त्‍या झांडाना जगविण्यासाठी काही दिवस पाणी देवून त्‍याची देखभाल करणे गरजेचे आहे. यामुळे किमान झाडे मोठी होईपर्यंत तरी सामाजिक वनिकरणाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी आता केली जात आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidhan Parishad Election : महायुतीचा जागावाटापाच तिढा सुटला, १७ जागांसाठीचा अंतिम फॉर्म्युला निश्चित, कुणाच्या वाट्याला किती जागा?

IPL 2026, RCB vs GT Final: टॉस हरूनही शुभमन गिल म्हणतोय, मनासारखंच झालं! फायनलसाठी कशी आहे Playing XI

Eknath Shinde: बीएमसीपासून विधान परिषदपर्यंत भाजपकडून धक्के... एकनाथ शिंदेंनी सुरू केली मोठी तयारी; महाराष्ट्राच्या राजकारणात नवी चुरस

IPL 2026 Final, RCB vs GT live: बंगळुरू - गुजरात संघात महामुकाबला! रजत पाटिदारने जिंकला टॉस

Mumbai Water Metro: मुंबईकरांसाठी गुडन्यूज! पहिली वॉटर मेट्रो दाखल, प्रवासी सेवेत कधी उतरणार?

SCROLL FOR NEXT