औरंगाबाद : शासकीय विद्यानिकेतन माजी विद्यार्थी संस्थेचे डॉ. राजेंद्रसिंग परदेशी यांनी देवीलाल पाडवीकडे धनादेश सोपवला.  
मराठवाडा

व्हॉटसअपवरुन निरोप फिरताच झाला आदिवासी मुलाचा प्रवेश निश्‍चित

मधुकर कांबळे


औरंगाबाद : गुणवत्ता असूनही केवळ अर्थिक परिस्थितीमुळे वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश मिळूनही पैशाअभावी प्रवेश रद्द होतो की काय अशी आदिवासी विद्यार्थ्याची अवस्था झाली. मात्र, या विद्यार्थ्याच्या मदतीला शासकीय विद्यानिकेतच्या माजी विद्यार्थ्यांची संस्था पुढे आली. व्हाटसऍपवरुन निरोप मिळाले, 1 लाख 60 हजार रुपये जमा झाले आणि देवीलाल पाडवी या विद्यार्थ्याचा एमबीबीएससाठी प्रवेश निश्‍चित झाला. 

ग्रामीण भागात तसेच डोंगर दऱ्यात गुणवत्ता असते मात्र केवळ परिस्थितीमुळे ती जगापुढे येऊ शकत नाही. अशीच अवस्था तळोदा तालुक्‍यातील (जि. नंदूरबार) वालेर येथील देवीलाल पाडवी या विद्यार्थ्याची झाली होती. आदिवासी विद्यार्थ्यांना शुल्क माफ असते मात्र त्याचा नंबर लातूर येथील खासगी एमआयएमएलआर मेडीकल कॉलेजमध्ये लागला. खासगी महाविद्यालयात 1 लाख 30 हजार अनामत व वसतीगृहासाठी 30 हजार लगेच भरुन प्रवेश निश्‍चित करायचा होता, ही रक्‍कम एका आठवड्यात भरायची होती. मात्र पाडवी याची परिस्थिती एवढी फीस भरण्याइतकी नसल्याने त्याचा प्रवेश रद्द होण्याची वेळ आली.

शासकीय विद्यानिकेतन औरंगाबाद येथील माजी विद्यार्थ्यांची संस्था गरीब होतकरु विद्यार्थ्यांना व शाळेच्या प्रगतीसाठी आर्थिक मदत करत असते. देवीलाल पाडवीदेखील याच शाळेतून शिकलेला गुणवंत विद्यार्थी, त्याविषयीची संस्थेच्या सदस्यांना माहिती मिळाल्यानंतर संस्थेच्या व्हॉटसअप ग्रुपवरुन निरोप आले आणि संस्थेतर्फे 1 लाख 60 हजार लातूरच्या मेडिकल कॉलेज प्रवेशासाठी देण्यात आले. एवढेच नव्हे तर देवीलाल पाडवी याच्या शिक्षणासाठी संस्था यापुढेही मदतीसाठी तत्पर राहील, असे डॉ. राजेंद्रसिंग परदेशी यांनी त्याला आश्‍वासन दिले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Auction live : मुंबई इंडियन्सची स्वस्तात मस्त डील! रोहित शर्माला तगडा ओपनिंग पार्टनर मिळाला, झाली घरवापसी; चिंता मिटली

Mumbai News: कायदा पोलिसांना लागू नाही का? उच्च न्यायालयाचा सवाल; केंद्राला भूमिका स्पष्‍ट करण्याचे आदेश

IPL 2026 Auction: वेंकटेश अय्यरची किंमत तब्बल १६.७५ कोटींनी झाली कमी! माजी विजेत्यांनी केलं खरेदी

IPL 2026 Auction live : खिशात नाही दाणा अन्... ! Mumbai Indians च्या खेळीने सारे चक्रावले; CSK च्या रणनीतीने KKR चा खिसा कापला...

Latest Marathi News Live Update : अरूप बिस्वास यांची ममता बॅनर्जी यांना पत्र लिहून क्रीडा मंत्री पदावरून मुक्त करण्याची विनंती

SCROLL FOR NEXT