dharashiv sakal
मराठवाडा

Dharashiv News : तुळजाभवानी कृषी महोत्सव गुरुवारपासून ; धाराशिवमध्ये उपक्रम, मिळणार विविध विषयांची माहिती

दुग्ध व्यवसायासाठी शासनाच्या योजना, दुग्ध प्रक्रिया उद्योगाबाबतच्या तंत्रज्ञानावरही चर्चा होणार आहे. शेतकरी उत्पादक कंपन्या, त्यासाठी बँकांचे कर्जाचे धोरण याची माहिती मिळणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

धाराशिव : श्री तुळजाभवानी कृषी महोत्सवाला येथे गुरुवारपासून (ता. १८) सुरवात होत आहे. त्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. पिकांची लागवड, जोपासना तसेच विक्री व्यवस्थापन यावर परिसंवाद, चर्चासत्रांतून शेतकऱ्यांना तांत्रिक दिशा मिळणार आहे, अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.

शासनाचा कृषी विभाग, ‘आत्मा’ तसेच कृषी विज्ञान केंद्र, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून २२ जानेवारीदरम्यान हा महोत्सव होत आहे. धाराशिव शहरातील पोलिस कवायत मैदानावर तो होईल.

याची मिळणार माहिती

रब्बी, खरीप तसेच उन्हाळी हंगामात पिकांची आधुनिक पद्धतीने लागवड कशी करावी यावर वसंत सूर्यवंशी, डॉ. अरुण गुट्टे मार्गदर्शन करणार आहेत. जिल्ह्यात रेशीम शेतीचे क्षेत्र वाढत आहे. त्यासाठी रेशीम शेतीचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न होणार आहे. फळबाग लागवडीवर धाराशिव येथील कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. एम. बी. पाटील मार्गदर्शन करणार आहेत. दुग्ध व्यवसायासाठी शासनाच्या योजना, दुग्ध प्रक्रिया उद्योगाबाबतच्या तंत्रज्ञानावरही चर्चा होणार आहे. शेतकरी उत्पादक कंपन्या, त्यासाठी बँकांचे कर्जाचे धोरण याची माहिती मिळणार आहे.

शेतकरी हाच प्रमुख शास्त्रज्ञ असून त्याचे प्रयोग इतरांना पाहता यावेत, यासाठी प्रयोगशील शेतकऱ्यांना निमंत्रित केले आहे. महोत्सवात स्टॉलच्या माध्यमातून त्यांना संधी दिली आहे. शेतमाल विक्रीसाठी खरेदीदार-विक्रेता संमेलन होणार आहे.

- रवींद्र माने, अधीक्षक कृषी अधिकारी, धाराशिव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood: नेपाळच्या महापुरात महाराष्ट्रातील ११० हून अधिक पर्यटक अडकले; मुंबईतील डॉक्टर दाम्पत्याशीही संपर्क तुटला..

Sugar Rates: ६४०० रुपयांवर गेलेली साखर अचानक ४८०० वर! नेमकं आठवडाभरात काय घडलं?

Nepal Flood : नेपाळमध्ये महापुराचा हाहाकार! ३९२ जणांचा मृत्यू, १५०० बेपत्ता; २९० भारतीयांशी संपर्क तुटला

आजचे राशिभविष्य - 28 ऑगस्ट 2026

Narali Bhat: नारळी भात तर प्रत्येकाच्या घरी बनतो! पण ‘या’ रेसिपीची चव लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच भुरळ पाडेल

SCROLL FOR NEXT