तुळजाभवानी माता sakal News
मराठवाडा

Tuljapur News : तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्रोत्सवाला सुरवात ; मंदिरात घटस्थापनेसह विविध कार्यक्रम

तुळजाभवानी मंदिरात घटस्थापनेसह विविध कार्यक्रम

सकाळ वृत्तसेवा

तुळजापूर : तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्रोत्सवाला गुरुवारपासून (ता. १८) सुरवात झाली. देवीची शेजघरातील निद्रिस्त मूर्ती पहाटे सिंहासनावर अधिष्ठित करण्यात आली. सकाळी सहा ते सकाळी नऊपर्यंत नित्योपचार अभिषेक झाले. देवीला वस्त्रालंकाराचा पेहराव करण्यात आला. दर्शनासाठी भाविकांची वर्दळ सुरू होती. उत्सव २५ जानेवारीपर्यंत चालेल. विविध कार्यक्रम होतील.

शाकंभरी नवरात्रोत्सवाचे यजमान विनोद सोंजी, त्यांच्या पत्नी अनुराधा सोंजी यांनी देवीचे दश॔न घेतले. त्यानंतर सवाद्य मिरवणुकीने मंदिरापासून गोमुख तीर्थकुंडापर्यंत जाऊन जलकुंभाची पूजा केली. सवाद्य मिरवणुकीने जलकुंभ मंदिरातील गणेशविहार परिसरात आणण्यात आला. तेथे घटस्थापना झाली. यजमान सोंजी दांपत्याच्या हस्ते गणेशपूजन, वरूणपूजन, कलशपूजन आदी धार्मिक विधी झाले.

मंदिर समितीचे सरव्यवस्थापक सोमनाथ माळी, धार्मिक व्‍यवस्‍थापक सिद्धेश्वर इंतुले, विश्वास कदम, जयसिंग पाटील, महंत तुकोजीबुवा, महंत हमरोजीबुवा, महंत वाकोजीबुवा, भोपे मंडळाचे अध्यक्ष अमर परमेश्वर, पुजारी मंडळाचे उपाध्यक्ष विपिन शिंदे, उपाध्ये मंडळाचे अध्यक्ष अनंत कोंडो, किशोर गंगणे, सचिन अमृतराव, बाळासाहेब भोसले आदी उपस्थित होते.

धार्मिक कार्यक्रम सुरू

तुळजाभवानी मंदिरात दुर्गासहस्त्रनाम, भवानीसहस्त्रनाम, दुर्गासप्तशती, नवग्रहजप आदींसह विविध धार्मिक कार्यक्रमांना सुरवात झाली. २५ जानेवारीपर्यंत विविध कार्यक्रम होतील. दरम्यान, तुळजाभवानी मंदिरात दरवर्षी एका मंडळास शाकंभरी नवरात्रोत्सवाच्या यजमानपदाचा मान मिळतो. यंदा भोपे मंडळाकडे यजमानपद आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tomato Rate: लाल टोमॅटोने महागाईची झळ वाढवली! स्वस्त दरात विक्रीसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सर्वसामान्यांना दिलासा मिळणार

IND vs IRE: भारताचा T20I संघ आयर्लंडला पोहचला! कधी आणि कुठे पाहाणार सामने? तारखेसह Live Streaming डिटेल्स नोट करून ठेवा

Thane Crime: कल्याण हादरलं! टोमॅटो देतो सांगून स्वतःजवळ बोलावलं अन्...; ५५ वर्षीय शेखनं ७ वर्षीय चिमुकलीसोबत धक्कादायक कृत्य केलं

IndiGo Cabs : इंडिगोची कॅब सर्व्हिस सुरू! एअरपोर्ट पिकअप-ड्रॉप फक्त 49 रुपयांमध्ये, कसं बुक करायचं? पाहा एका क्लिकवर

Latest Marathi News Live Update : सोयगावच्या जरंडी परिसरात दीड तास ढगफुटी सदृश्य पाऊस; नदी- नाल्यांना पूर

SCROLL FOR NEXT