cn alure cn alure
मराठवाडा

तुळजापुरचे माजी आमदार आलुरे गुरुजींचे निधन

माजी आमदार सि. ना. आलुरे हे गुरुजी या टोपण नावाने परिचित होते. राजकीय, सामाजिक, सहकार आणि शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी आपला ठसा उमटवला

सकाळ वृत्तसेवा

उस्मानाबाद: तुळजापूर तालुक्याचे माजी आमदार सि. ना. आलुरे (c.n. alure pass away) (गुरुजी) ( 90) यांचे आज सोमवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास निधन झाले. सोलापूर येथील अश्विनी रुग्णालयात गेल्या आठ दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज दुपारी तीन वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

माजी आमदार सि. ना. आलुरे हे गुरुजी या टोपण नावाने परिचित होते. राजकीय, सामाजिक, सहकार आणि शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी आपला ठसा उमटवला. काँग्रेस पक्षाचे एक निष्ठावंत सहकारी म्हणून अनेक वर्षे त्यांनी काम केलं. 1980 ला ते आमदारही झाले. शेतकरी कामगार पक्षाचे तत्कालीन आमदार माणिकराव ठाकरे यांचा पराभव करून ते आमदार झाले. सहकार क्षेत्रांमध्येही त्यांचे मोठे योगदान आहे. तुळजाभवानी सहकारी साखर कारखान्याची पायाभरणी त्यांच्याच कार्यकाळात झाली.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार मधुकरराव चव्हाण यांचे एकनिष्ठ सहकारी म्हणून तालुक्यात ओळखले जात. अनेक सहकारी संस्था या गुरुजींच्या कार्यकाळात उदयाला आल्या. शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांचे भरीव योगदान आहे. शिक्षण प्रसारक मंडळ अणदूरच्या माध्यमातून त्यांनी तालुक्याच्या विविध भागांमध्ये शिक्षणाचे जाळे पसरवले आहे. लातूर येथील बसवेश्वर कॉलेजच्या निर्मितीतही त्यांचे मोठे योगदान होते. त्यांनी कॉलेजच्या संस्थेवर उपाध्यक्ष म्हणूनही काम पाहिले. सिद्धेश्वर सहकारी बँक (लातूर)चे संस्थापक अध्यक्ष होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CISF जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार, असिस्टंट कमांडंटसह ४ जवानांचा मृत्यू

Vani News : सासरी होणाऱ्या मानहानी अन् छळाला कंटाळून तरुणाने संपविले जीवन; स्टेटसवर व्हिडिओ ठेवत उघड केला प्रकार

Japanese Encephalitis Virus: आसाममध्ये डासांमध्ये जपानी मेंदूज्वराचा जी-१ विषाणू प्रथमच आढळला; ‘एनआयव्ही’ पुण्याचे संशोधन अमेरिकन जर्नलमध्ये प्रकाशित

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

SCROLL FOR NEXT