safa baitulmal organisation sakal
मराठवाडा

Jintur News : सफा बैतूलमालची बारा वर्षांची परंपरा: चारशे गरीब कुटूंबाना धान्याचे किट वाटप

सफा बैतूलमाल या सामाजिक संघटनेच्या वतीने मागील बारा परंपरा कायम ठेवत रमजान रमजान महिन्याचे औचित्य साधत मुस्लिम समाजातील चारशे गरीब कुटुंबांना धान्याचे किट वितरित केले.

राजाभाऊ नगरकर

जिंतूर - येथील सफा बैतूलमाल या सामाजिक संघटनेच्या वतीने मागील बारा परंपरा कायम ठेवत रमजान रमजान महिन्याचे औचित्य साधत मुस्लिम समाजातील चारशे गरीब कुटुंबांना धान्याचे किट वितरित केले.

यानिमित्त जमियत उलमा हिंदचे मराठवाडा अध्यक्ष मुफ्ती मिर्झा कलीम बेग यांच्या मार्गदशनाखाली सोमवारी (ता. ०१) सफा बैतुलमाल संघटनेच्या वतीने शहर व परिसरातील आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या चारशे गरीब कुटुंबांना धान्याचे व शिरखुरमासाठी पौष्टिक खाद्यपदार्थांचे किट वितरित केले.

मुफ्ती मिर्झा कलीम बेग यांच्या मार्गदर्शनाखाली इम्रान सय्यानी हे बारा वर्षापासून शहरात सफा बैतुलमाल ही सामाजिक संघटना चालवत असून, दरवर्षी रमजान महिन्यात मुस्लिम समाज बाधवांकडून जकात, सदका, अतिया व इसाले सवाबचे पैसे जमा करून त्या पैशातून शहरासह तालुक्यात वेगवेगळ्या गावातील गोरगरीब, विधवा, परित्यक्ता महिलांना रमजान महिन्यात उपास (रोजे) ठेवून कामासाठी घराबाहेर पडण्याची गरज पडू नये, अशा कुटुंबांना एक महिना पुरेल एवढ अन्नधान्य व ईद साठी शिरखुरमा किट वाटप करण्यात येते.

याही वर्षी सज्जाद वैय्या, शेख रहमत, जुमान चाऊस, ओसामा बेग मिर्झा, बरकत गुत्तेदार आदींनी मुस्लिम दानशूर व्यक्तींकडून जकात व अन्य रूपाने आर्थिक मदत जमा करून त्यातून चारशे गरजू कुटूंबाना गहू, तांदूळ, डाळी, तेल, साबण, मसाले तसेच ईदच्या दिवशी शिरखुरमा करण्यासाठी लागणारा सुका मेवा,साखर आदींचा समावेश असलेले किट वितरित केले.

दानशूर व्यक्तींनी मदत करावी

रमजान महिन्यात दानशूर नागरिकांवर (सोने, चांदी, रोख रक्कम, स्थावर मालमत्तेवर) जकात देणे बंधनकारक असून एक लाख रुपयांवर अडीच हजार रुपये जकात असून, जास्तीत जास्त नागरिकांनी जास्तीत जास्त गरजू कुटूंबाना मदत करण्यासाठी आपल्या जकात मधील थोडीफार रक्कम सफा बैतुलमाल संघटनेला द्यावी.असे मुफ्ती मिर्झा कलीम बेग यांनी आवाहन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Pune : छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत अमित शाहंचा फोटो; 'भारताचा चाणक्य' म्हणून वादग्रस्त बॅनर?; काँग्रेसने विरोध करताच पोस्टर गायब

दिल्लीच्या गाजलेल्या CJP आंदोलनावर येणार सिनेमा; पडद्यामागचं 'सत्य' उलगडणार?

अमेरिकेत ट्विटर बॅन करताना दिलेलं कारण मनाला लागलं, म्हणून भारतात आलो; अभिजीत दीपके काय म्हणाला?

Latest Marathi News Live Update : राज ठाकरेंचा मुलगा नसतो तर राजकारणात नसतो : अमित ठाकरे

Health Minister Prakash Abitkar : अवैध गर्भपात करणाऱ्या कुटुंबांची आता खैर नाही! डिसेंबरमध्ये येणार नवा कडक कायदा; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची मोठी माहिती

SCROLL FOR NEXT