NND20KJP02.jpg 
मराठवाडा

नांदेडमध्ये अडीच महिन्यात वीस शेतकरी आत्महत्या

कृष्णा जोमेगावकर

नांदेड : सततच्या नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत आलेले शेतकरी आत्महत्या करताना दिसून येत आहे. नवीन वर्षातही शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरूच आहेत. ता. एक जानेवारी ते ता. १६ मार्च या अडीच महिन्यांच्या कालावधीत वीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. आत्महत्या केलेल्या वीस पैकी १४ शेतकरी कुटुंबांना मदत देण्यात आली, तर तीन घटना अपात्र ठरल्या आहेत. तीन प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत. मागील वर्षी जिल्ह्यात १२२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या.

सततच्या संकटामुळे शेतकरी अडचणीत
जिल्ह्यात मागील सतरा वर्षांपासून शेतकरी आत्महत्या होत आहेत. यात २०१४ पासून मोठ्या प्रमाणात भर पडली. सततचा दुष्काळ, कर्जाचा वाढणारा डोंगर यामुळे शेतकरी आत्महत्येचा मार्ग अवलंबत आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कधी कोरडा दुष्काळ, तर कधी अतिवृष्टी. यातूनही चुकून समाधानकारक पाऊस झालाच तर अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे हातातोंडाशी आलेली पिके वाया जातात. काही दिवसांच्या पावसातच महिनाभराची सरासरी गाठली जाते. यामुळे निसर्गावर अवलंबून असलेला हंगाम हातून जातो. यासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड होत नाही. दुष्काळी परिस्थितीत शेतकरी कोलमडून पडल्यामुळे ते टोकाचे पाऊल उचलतात. यामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत. 

अडीच माहिन्यात वीस घटना
यंदा ता. एक जानेवारी ते ता. १६ मार्च या कालावधीत २० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यात जानेवारीमध्ये सात, फेब्रुवारीमध्ये नऊ, तर ता. १६ मार्चपर्यंत चार शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे.

हेही वाचलेच पाहिजे....ट्रक-दुचाकीच्या धडकेत दोन ठार

मागील वर्षी १२२ आत्महत्या
जिल्ह्यात २०१९ मध्ये आजपर्यंत १२२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. जानेवारी महिन्यात सात, फेब्रुवारीत दहा, मार्चमध्ये दहा, एप्रिलमध्ये तीन, मेमध्ये बारा, जून आणि जुलैमध्ये प्रत्येकी अकरा, ऑगष्टमध्ये तेरा, सप्टेंबरमध्ये नऊ, ऑक्टोबरमध्ये सात, नोव्हेंबरमध्ये अठरा, तर डिसेंबरमध्ये आठ घटना घडल्या होत्या.

सहा वर्षांत ८६१ आत्महत्या
सहा वर्षांत ८६१ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. यात २०१४ मध्ये ११८, २०१५ मध्ये १९०, २०१६ मध्ये १८०, २०१७ मध्ये १५३, २०१८ मध्ये ९८, २०१९ मध्ये १२२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. चालू वर्षात १२२ घटना घडल्या. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News: नावडत्या भेंडीच्या भाजीवरून घर सोडले; आईशी घातला वाद; १७ वर्षीय मुलाने ट्रेनने गाठली दिल्ली

ENG vs IND,3rd Test: बुमराहने कॅच घेतला अन् सिराजने इंग्लंडच्या सलामीवीराच्या समोर जाऊन केलं आक्रमक सेलिब्रेशन; Video

Nagpur News: मान हॉटेलमधील कुंटणखान्यावर छापा; जबलपूर महामार्गावरील घटना, पीडितेची सुटका, ६० हजारांचा ऐवज जप्त

Latest Marathi News Updates :दोन गट हातात कोयता घेऊन आमनेसामने; पोलिसांच्या तत्परतेने अनर्थ टळला

Nagpur News : ऑनलाइन बेटिंग रॅकेटचा पर्दाफाश; २० कोटींचे व्यवहा, छत्तीसगढ पोलिसांकडून नागपुरात सहा जणांना अटक

SCROLL FOR NEXT