file photo 
मराठवाडा

सोनाराला फसवून सोने लुटनाऱ्या इराणी टोळीतील दोन आरोपीतांना अटक, एक लाख सात हजार ५०० रुपयाचा मुद्देमाल जप्त

राजेश दारव्हेकर

हिंगोली : वसमत शहरातील सराफा बाजारातील दुकाणात झालेल्या चोरीतील सोन्याचे दागीने चोरी केल्या प्रकरणी व सोनाराला फसविणारे बिदर, कर्नाटक राज्यातील आरोपींकडून सोन्याच्या दागीन्यासह एक लाख सात हजार पाचशे रुपयाचा ऐवज जप्त करुन दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवार ( ता. आठ  ) अटक केली आहे.

वसमत शहर पोलिसात गुन्हा दाखल झाल्यावरून सदर गुन्हयामधील सोन्याचे दागीणे चोरणारे आरोपी हे बिदर राज्य कर्नाटक येथील असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून पोलिस अधीक्षक राकेश कलासागर यांचे आदेशाने व पोलिस निरिक्षक उदय खंडेराय यांच्या परवानगीने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरिक्षक शिवसांब घेवारे यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार करून बिदर येथे रवाना करण्यात आले होते.

दरम्यान सदर पथकातील पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी पोलिस स्टेशन गांधीगंज, बिदर राज्य कर्नाटक येथील स्थानिक पोलिसांचे मदतीने तेथील सदर गुन्ह्यातील अज्ञात व संशयीत आरोपीतांचा शोध घेउन संशईत आरोपी  शब्बीर अली,  व मोहमद अली रा. ईराणी गल्ली चिद्रा रोड, बिदर राज्य कर्नाटक हे मिळून आले.

गोपनीय व खात्रीलाय माहिती नुसार व त्यांना विश्वासात घेउन चौकशी केली असता सदर आरोपी व त्यांचा एक मोठा भाउ रजा हुसेन उर्फ तसीया अफसर अली व मेंव्हणा गुलाम अली यांनी ११ जानेवारी सोन्याच्या दागीन्याची चोरी केल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्याने त्यांनीच गुन्हा केल्याचे कबुल केल्याने त्यांच्याकडून आरोपी रजा हुसेन याने गुन्ह्यात वापरलेली एक मोटार सायकल व सोन्याचे दागीणे असे एकूण एक लाख सात हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल समक्ष हजर केल्याने तो जप्त करून सदर आरोपीतांना बिदर राज्य कर्नाटक येथून घेउन येउन गुन्हयातील सर्व आरोपी निष्पन्न झाले. सदर ताब्यात घेण्यात आलेल्या दोन आरोपीतांना त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेले सोन्याचे दागीने व एक मोटार सायकलसह वसमत शहर  पोलिसाच्या  ताब्यात  सोमवारी ( ता. आठ) सायंकाळी रिपोर्टसह देण्यात आले आहे.

सदरची कार्यवाही पोलिस अधीक्षक राकेश कलासागर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक यशवंत काळे, पोलिस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक शिवसांब घेवारे,  बालाजी बोके, विलास सोनवणे, संभाजी लकुळे, भगवान आडे, किशोर कातकडे, विशाल घोळवे, दिपक पाटील, आकाश टापरे यांच्या पथकाने केली आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT