hingoli sakal
मराठवाडा

गल्लोगल्लीत फिरणार दोन कृत्रिम तलाव

हिंगोलीत गणेशमूर्ती विसर्जनासाठी प्रशासनाची तयारी सुरू

सकाळ वृत्तसेवा

हिंगोली : हिंगोली येथे गणेश मूर्ती विसर्जनासाठी पालिकेने सात कृत्रिम तलाव तसेच दोन फिरते कृत्रिम तलाव तयार केले आहेत. गल्लोगल्ली कृत्रिम तलाव फिरवली जाणार असल्याचे मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांनी सांगितले आहे.

हिंगोलीत ७२ गणेशमूर्तीची स्थापना करण्यात आली असून सहा दिवसाचा कलावधी संपला आहे रविवारी ता. १९ अनंत चतुर्थीला गणेश मूर्तीचे विसर्जन केले जाते. त्याची तयारी सुरू झाली आहे. कोविडच्या नियमांचे पालन करत गणेशोत्सव साजरा केला जात आहे. विसर्जनाच्या दिवशी होणारी गर्दी लक्षात घेता चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी यापूर्वीच सूचना दिल्या आहेत. पालिकेने शहरातील सार्वजनिक व घरगुती गणेशमूर्ती विसर्जनाच्यावेळी गर्दी होऊ नये यासाठी सात कृत्रिम तलाव तयार केले आहेत. दोन फिरते तलाव देखील केले आहेत. यात तिरुपती नगर, आदर्श कॉलनी, रिसाला बाजार, शिवाजीनगर, जुने पालिका कार्यालय, एनटीसी, गांधी चौक येथे हे तलाव ठेवले जाणार आहे. कृत्रिम फिरते तलाव शहरात फिरणार असून पालिकेचे कर्मचारी सोबत राहणार आहेत. कोविडची पार्श्वभूमी ही व्यवस्था करण्यात आली आहे.

शहरात सात ठिकाणी ठेवल्या जाणाऱ्या कृत्रिम तलावाच्या ठिकाणी अमृतकलश कुंड ठेवले जाणार आहे. या कलशामध्ये निर्माल्य जमा केले जाणार आहेत. तसेच जलेश्वर तलाव, सिरेहकशाह बाबा तलाव व कयाधू नदी येथे पाहणी देखील मुख्याधिकारी डॉ. कुरवाडे यांनी पाहणी केली आहे. कृत्रिम तलावातच गणेशमूर्ती विसर्जन करावे असे आवाहन डॉ. कुरवाडे यांनी नागरिकांना केले आहे.

असा असेल तलाव

घरगुती छोट्या गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी ट्रॅक्टरमध्ये प्लास्टीकचा तलाव दारापर्यंत येणार आहे. त्यामुळे नागरिकांना गणेशमूर्ती विसर्जनासाठी विसर्जनविहिरीवर किंवा तलावावर गर्दी करण्याची गरज पडणार नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आणि शिवसेनेपासून राज ठाकरे दूर का होत गेले? वाद ते मनोमिलन timeline

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलच्या ३००+ धावा! मोडला विराट कोहलीचा ११ वर्षांपूर्वीचा विक्रम, रिषभ पंतचीही फिफ्टी

Sushil Kedia: माज उतरला, पण गुर्मी कायम; माफीनंतरही नवं ट्विट करत सुशील केडिया पुन्हा बरळले, शहांची स्तुती तर ठाकरेंना...

Divyang Students Demand : दिव्यांग विद्यार्थ्यांची होतेय कुचंबना! ३० जुलैपर्यंत वसतिगृहाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा...; विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा

Raigad News: अलिबाग मार्गावरील कोंडी सुटणार, प्रवाशांचा आरामदायी प्रवास होणार; सरकारचा प्लॅन सत्यात उतरणार

SCROLL FOR NEXT