उमरगा : एस. टी. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संपाला एक महिना झाला तरी आणखी तोडगा निघू शकला नाही. पगारवाढीचा प्रस्तावालाही अप्रत्यक्षात नकार देत विलीनीकरणाच्या मागणीवर कर्मचारी ठाम असल्याने कर्मचाऱ्यांचे बैठा आंदोलन सुरू आहे. दरम्यान शनिवारी (ता. २७) सकाळी उमरगा बसस्थानकातुन उस्मानाबादला जाण्यासाठी दोन बसेस सोडण्यात आल्या. या वेळी वहाक, चालकांना इतर कर्मचाऱ्यांनी विरोध केला ; तरीही त्यांनी आपल्या मतावर ठाम राहुन ड्यूटी केली.
विविध न्याय मागण्यांसाठी एस.टी. कर्मचाऱ्यांनी राज्यात २७ ऑक्टोबरला संप सुरू केला होता, उमरगा आगारात संपाची तीव्रता प्रत्यक्षात सात नोव्हेंबरपासुन सुरु झाली. ती अजुनही कायम आहे, परिवहन मंत्री अनिल परब यांनी पगारवाढीचा निर्णय घेतल्यानंतरही कर्मचाऱ्यांनी पगारवाढीपेक्षा विलिनीकरणाच्या मागणीवर जोर धरला आहे. दरम्यान उमरगा आगारात एकूण कर्मचारी ४११ आहेत त्यापैकी संपात सहभागी कर्मचारी चारशे आहेत. सात कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आलेले आहे. पगारवाढीच्या निर्णयानंतर कामावर रुजू होण्याचे आदेश असल्याने उमरगा आगारात प्रशासकिय कामकाज पाहणारे सोळा आणि दोन चालक, दोन वहाक असे वीस कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत मात्र जवळपास ९५ टक्के कर्मचाऱ्यांनी संपात सहभागी रहाण्याचा निर्णय घेतला आहे.
ड्यूटीवर रूजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर दबाव !
उमरगा आगारातुन शनिवारी उस्मानाबादला दोन बसेस गेल्या. पहिल्या फेरीला चालक बाबुराव पवार,वहाक श्री. कंटे गेले, त्या बसमध्ये चार ते पाच प्रवाशी होते. साडे अकराच्या सुमारास निघालेल्या बसवर चालक सुनिल शेंडगे होते, त्यांना निलंबित करण्यात आले होते. महिला, पुरुष कर्मचाऱ्यांनी त्यांना तुम्ही ड्यूटीवर रुजू होणे बरोबर नाही, न्याय मागण्यासाठी आपल्याच कर्मचाऱ्यांनी बलिदान दिले त्याची जाणीव ठेवा. असे फर्मावले, तेंव्हा माझीही अडचण लक्षात घ्यावा असे म्हणत श्री. शेंडगे यांनी ड्यूटी केली.
" एस.टी. कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्यासाठी आत्तापर्यंत टोलवाटोलवीच झाली आहे. झालेल्या निर्णयाची अमलबजावणी केली जात नाही. दहा वर्षापर्यंत सेवा करणाऱ्यांना पाच हजार, दहा ते वीस वर्ष सेवा करणाऱ्यांना चार हजार तर २० ते ३० वर्ष सेवा करणाऱ्यांना अडीच हजार रुपये पगारवाढ, हा कुठला न्याय आहे. पाच हजार रूपयाची सरसकट वेतनवाढ केली तर पदनिहाय सेवा जेष्ठतेनुसार वेतनवाढ होईल.
- जयवंत जाधव, संचालक एस.टी. बँक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.