Latur News  Esakal
मराठवाडा

Latur News : धक्कादायक! तलावात बुडून आईसह दोन मुलांचा मृत्यू

महिलेचा मृतदेह सापडला तर त्या दोन मुलांचा शोध सुरूच

अंकिता खाणे (Ankita Khane)

लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील बनशेळकी तलावात आईसह दोन मुले बुडाल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती उदगीर ग्रामीण पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस पथकांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन मनीषा गौतम शिरसाठ या महिलेचा मृतदेह तलावाबाहेर काढला आहे. पण अद्यापही त्या दोन मुलांचा शोध सुरूच आहे.

उदगीर जवळील बनशेळकी तलावाच्या काठावर एका महिलेची चप्पल, आधारकार्ड, पुरुषांचे बूट, तिच्या नऊ वर्षे वयाच्या मुलांसह तीन वर्षीय मुलींचे आधार कार्ड आढळुन आले आहे. या सर्व गोष्टीच्या आधारे उर्वरित दोघांच्या शोधासाठी आपत्ती व्यवस्थापनाच्या जवानांच्या मदतीने तीन तास रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आले.

आपत्ती व्यवस्थापनाच्या जवानांच्या शोधमोहीमेनंतरही या दोन मुलांचा शोध अद्याप लागलेला नाही. पोलिसांनी नातेवाईकांकडे चौकशी केली असता मनीषाच्या पतीचे निधन झाल्याने तीची मानसिक अवस्था ठीक नसल्यासारखी वागत होती. आधार कार्ड काढण्याचे कारण सांगून ती मुलांना घेऊन घराबाहेर पडली आणि आपल्या दोन्ही मुलांसह तीने तलावात उडी घेतली.

या घटनेची माहिती मिळताच सर्वांचा शोध सुरू झाला. पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांनी घटनास्थळाची पाहणी केली. महिलेचा मृतदेह सापडला असून दोन मुलांच्या मृतदेहाचा शोध अद्याप लागला नसल्याची माहिती बिट जमादार शिवप्रताप रंगवाळ यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : उत्तरप्रदेशात मराठी तरुणाला भोजपुरीत बोलण्यासाठी दमदाटी, भाषा येत नाही म्हटल्यावर....पाहा व्हिडीओ

Latest Maharashtra News Live Updates: नांदगावच्या दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान, ग्रामस्थ आनंदीत

VIRAL VIDEO: दुध विक्रेता चक्क दुधात थुंकला, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या विठ्ठल मंदिरांत आषाढीला भक्तीचा झगमगाट

Crime News: हॉर्न वाजविल्याच्या किरकोळ कारणाने दोन गटांत हाणामारी; सूतगिरणी चौकातील घटना

SCROLL FOR NEXT