फोटो 
मराठवाडा

पत्नीसह दोन मुलांचा खून करून विहिरीत टाकले

हाफीज घडीवाला

कंधार (जिल्हा नांदेड) : माहेरून घर बांधण्यासाठी तीन लाख रुपये न आणल्यामुळे एका विवाहितेला तिच्या दोन मुलांना ठार मारून तीने आत्महत्या केल्याचे भासविणाऱ्या सासरच्या मंडळीवर कंधार पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गोणार (ता. कंधार) येथे रविवारी (ता. एक) डिसेंबर सायंकाळी घडली. घटना घडल्यासून सासरची मंडळी फरार असून त्यांना जोपर्यंत अटक करणार नाहीत तोपर्यंत मतिन्हीही मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा इशारा नातेवलाईकांना दिला आहे. सध्या विष्णुपूरी  येथील शासकिय रुग्णालयात तणावाचे वातावरण आहे. विहिरीत टाकणाऱ्या पतीसह पाच जनावर कंधार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

थाटामाटात केले होते लग्न

इज्जतगाव (ता. नायगाव) येथील रंजना (वय २७) हिचे लग्न गोणार (ता. कंधार) येथील शरद पवळे (वय ३५) याच्यासोबत हिंदु रितीरिवाजानुसार सर्व मानपानासह मोठ्या थाटात सन २००९ मध्ये लग्न झाले होते. सुरवातीला या विवाहिता रंजना हिला काही दिवस चांगले नांदवले. दरम्यानच्या काळात या दाम्पत्याला दिग्वीजय (वय नऊ) आणि वैभवी (वय सहा) अशी दोन गोंडस बाळं झाली. मात्र तिला माहेरून तीन लाख आणण्याचा तगादा लावला. पैसे नाही आणले तर तिचा मानसिक व शारिरीक छळ सुरू केला. परंतु मुलीला सासरी होणारा त्रास कमी व्हावा म्हणू तिच्या वडिलानी कर्ज काढून दीड लाख रुपये दिले. मुलीला त्रास देऊ नका म्हणून विनंती केली. परंतु तिचा छळ काही कमी झाला नाही. 

मारहाण करून उपाशी ठेवत

वेळप्रसंगी पती तिला मारहाण करून उपाशी ठेवत असे. ही मंडळी एवढ्यावरच न थांबता रविवारी (ता. एक) नोव्हेंबर सायंकाळच्या सुमारास याच कारणावरून या दाम्पत्यामध्ये वाद झाला. सासरच्या मंडळीनी संगनमत करून रंजनासह तिचा मुलगा दिग्विजय (वय नऊ) आणि मुलगी वैभवी (वय सहा) यांना ठार मारले. आपल्या शेतात असलेल्या विहीरीत तीन्ही मृतदेह फेकून दिले. आत्महत्या केल्याचा बहाणा करून त्यांनी तिच्या माहेरी कळविला. त्यानंतर पतीसह सासरची मंडळी पसार झाली. 

घटनास्थळाला वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची भेट 

नातेवाईकांनी तिचे सासर गाठले. तोपर्यंत घटनास्थळाला कंधार पोलिस निरीक्षक विकास जाधव यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी भेट दिली व पंचनामा केला. याप्रकरणी व्यकटेश बालाजी ढगे यांच्या फिर्यादीवरून आरोपी पती शरद पंडित पवळे, पंडित नारायण पवळे, मयनाबाई पंडित पवळे, मनोहर पंडित पवळे आणि सुनिता मनोहर पवळे यांच्याविरुद्ध खून व विवाहितेचा छळ भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मृतदेह रुग्णालयात पडून

पुढील तपास पोलीस निरीक्षक विकास जाधव करीत आहेत. तीन्ही मृतदेहावर उत्तरीय तपासणी झाली असून आरोपीना अटक करेपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही सा पावित्रा माहेरवासियांनी घेतला आहे. सध्या शासकिय रूग्णालयात तणावाचा वातावरण पसरले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT