file photo 
मराठवाडा

परभणी जिल्ह्यात दोन दिवसाची संचारबंदी; जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांचे आदेश

गणेश पांडे

परभणी ः कोरोना विषाणुच्या वाढत्या संसर्गामुळे जिल्ह्यातील नागरी भागात दोन दिवसाची संचारबंदी लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी शुक्रवारी (ता.12) दिले. ही संचारबंदी शुक्रवारी रात्री 12 वाजल्यापासून सुरु होणार असून सोमवारी (ता.15) सकाळी सहा वाजेपर्यंत राहील.

परभणी जिल्ह्यात कोरोना विषाणुचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. दिवसासाठी तब्बल 80 ते 84 रुग्ण सापडत असल्याने कोरोना संसर्गाचा विळखा जिल्हयाला पडत असल्याचे दिसत आहे. परभणी शहरातही कोरोना विषाणुचा संसर्ग मोठ्या प्रमाणात झाला आहे. याला प्रतिबंध करण्यासाठी प्रशासन प्रत्येक उपाय योजना राबवितांना दिसत आहेत. शहरात महापालिकेच्यावतीने व्यापाऱ्यांसाठी आरटीपीसीआर चाचणी ही बंधनकारक करण्यात आल्या आहेत. त्याची अमलबजावणी शुक्रवार पासून करण्यात येत आहे. शहरात चार ते पाच ठिकाणी आरटीपीसीआर ची चाचणी केली जात आहे. परंतू वाढता संसर्ग व लोकांचा बाजारपेठेतील वाढता वावर पाहता शहरात संचारबंदी लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी काढले आहेत. शहरात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना नियमांचे पालन होत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढण्यास कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाययोजना म्हणून जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्या संदर्भात पालकमंत्री नवाब मलिक यांच्याशी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी चर्चा केली. त्यानतंर शुक्रवारी दुपारी हा निर्णय घेण्यात आला. परभणी

जिल्ह्याच्या नागरी भागात दोन दिवसाची संचारबंदीचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिले आहेत. ही संचारबंदी शुक्रवारी (ता.12) पासून सोमवारी (ता.15) च्या सकाळी सहा पर्यंत लागू राहणार आहे.

संचारबंदीतून यांना राहणार सुट

सर्व शासकीय कार्यालये व त्यांचे कर्मचारी व वाहने, शासकीय व खासगी दवाखाने, औषधी दुकाने, लसीकरण केंद्र, कोरोना चाचणी केंद्र, अत्यावश्यक सेवेसाठी परवाने घेतलेली वाहने, पत्रकार, वितरक, पेट्रोलपंप, गॅस वितरक, दुध विक्रेते, परीक्षेसाठी जाणारे विद्यार्थी, शिक्षक, एसटी महामंडळाच्या बसेस यांना संचारबंदीतून सुट देण्यात आली आहे.

दुध विक्री फक्त घरोघरीच

दोन दिवस सकाळी दुध विक्रीसाठी येणाऱ्या दुध विक्रेत्यांना सकाळी सहा ते 9 वाजेपर्यंत सुट देण्यात आली आहे. परंतू त्यांना एका ठिकाणी जमा होता येणार नाही. तसेच कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी जाणारे व लस घेवून येणाऱ्या व्यक्तींना यातून सुट देण्यात आली आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Connection Rules : ...तर 'या' ग्राहकांना एलपीजी सिलिंडर मिळणार नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Virgo Horoscope : कन्या राशी साप्ताहिक राशिभविष्य (१५ ते २१ मार्च): मेहनतीचे फळ मिळणार; करिअरमध्ये मोठी उलथापालथ, घरी पैसा येणार

Leo Horoscope : सिंह राशी साप्ताहिक राशिभविष्य (१५ ते २१ मार्च): या आठवड्यात भाग्य तुमच्या पायाशी; धनलाभ योग, स्पर्धा परीक्षेत यश मिळणार

Cancer Horoscope : कर्क राशी साप्ताहिक राशिभविष्य (१५ ते २१ मार्च): सुरुवात कठीण, पण शेवट गाजणार; धनलाभ होईल अन् कामाच्या ठिकाणी मोठी कलाटणी

Gemini Horoscope : मिथुन राशी साप्ताहिक राशिभविष्य (१५ ते २१ मार्च): तुमचे निर्णय ठरणार गेमचेंजर; प्रेम, करिअर, पैसा सगळं एकदम हाताला लागणार

SCROLL FOR NEXT