Death in Accident Sakal
मराठवाडा

Accident : अनोळखी वहानाच्या धडकेत दोघांचा मृत्यू

जकेकूरवाडी पाटीजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या अनोळखी वहानाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दोघांचाही मृत्यू झाला.

अविनाश काळे

उमरगा - सोलापूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर उमरगा शहरापासुन दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या जकेकूरवाडी पाटीजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या अनोळखी वहानाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दोघांचाही मृत्यू झाला. रविवारी (ता. १९) रात्री साडेसातच्या सुमारास हा अपघात झाले. दोघेही मृत मुरुम (ता. उमरगा) येयील कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्मचारी आहेत.

या बाबतची माहिती अशी की, मुरुम बाजार समितीचे प्रभारी सचिव अण्णाराव कल्याणी कुंभार वय ५६ वर्ष रा. बेळंब ह. मु. महादेव नगर मुरुम व सुग्रीव श्रीरंग पाटील वय ५७ वर्ष रा. काळानिंबाळा ता. उमरगा ह. मु. यशवंतनगर मुरूम हे दोघे उमरगा येथून काम आटोपून मुरुमकडे दुचाकीवरून जात असताना अनोळखी वहानाने धडक दिली. त्यात अण्णाराव कुंभार यांचा जागीच मृत्यू झाला.

या अपघाताची माहिती मिळताच उमरगा - चौरस्ता येथे गेली बारा वर्षे अपघातग्रस्ताच्या मदतीला मोफत असलेली जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नाणिज धामची रुग्नवाहीका तातडीने घटनास्थळी दाखल झाली. गंभीर जखमी असलेले सुग्रीव पाटील यांना उप जिल्हा रुग्णालय दाखल केले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दोघांच्या मुत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान दोघेही कर्मचाऱ्यांची कांही महिन्यानंतर सेवानिवृत्ती होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Farmer Loan Waiver: आमदार प्रशांत बंब यांची पत्रकार परिषद; प्रत्येक पात्र शेतकऱ्यापर्यंत योजनेचा लाभ पोहोचविण्यासाठी विशेष मोहीम

वयाच्या ५४ वर्षीही लाचेचा मोह! एक लाखाची लाच मागणारा मंडलाधिकारी अटकेत; मुरूम वाहतुकीच्या परवानगी अर्जावरील सकारात्मक अहवालासाठी मागितली लाच, वाचा...

Shirur civic protest: घनकचरा गैरव्यवहार, किमान वेतन उल्लंघनासह विविध मागण्यांसाठी मनसेचे महिबूब सय्यद यांचे शिरूर नगरपरिषदेसमोर अन्नत्याग आंदोलन

Dighi-Bhosari MD lab bust: पुण्यातील दिघी-भोसरीत एमडीची हायटेक प्रयोगशाळा उघड; ‘ऑपरेशन वज्र’मध्ये दोन प्रमुख तस्कर अटकेत

‘एसआयआर’ कामात हलगर्जीपणा, शिक्षकाविरुद्ध गुन्हा! फोन उचलला नाही, घरी भेटले नाहीत, ‘कारणे दाखवा’चा खुलासाही दिला नाही, वाचा...

SCROLL FOR NEXT