मराठवाडा

नांदेड : पोहण्यास गेलेल्या दोन बालकांचा पाण्यात बुडून मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

अर्धापूर : बामणी (ता अर्धापूर जिल्हा नांदेड ) येथील गावाजळून जाणाऱ्या मेंढला नाल्यावरील बंधाऱ्यातील पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन शालेय विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (ता नऊ) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. पाण्यात बुडणाऱ्या तिघांचा जीव वाचविण्यात गजानन मुंगल या तरूणास यश आले आहे. पण तो आपल्या भावाचा प्राण वाचवू शकला नाही. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली असून, या बालकांच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे. तीन बालकांचा प्राण वाचविण्यासाठी जीवाची बाजी लावणारा गजानन दत्तारामजी मुंगल देवदूत ठरला आहे.

या घटनेबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, की बामणी गावाजळून मेंढला नाला जातो. या नाल्यावर बंधारा बांधण्यात आला असून, सध्या हा बंधारा तुडूंब भरला आहे. या बंधाऱ्यात गावातील गजानन सोनाजी कदम (वय 16), दीपक दत्तारामजी मुंगल (वय 15), विशाल उत्तम कदम, ओमकार संतोष कदम, जगदीश दुलबा कदम हे पाच बालक दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास पोहण्यासाठी गेले होते. या पाच बालकांना बंधाऱ्यात किती पाणी आहे, याचा अंदाज आला नाही. पोहण्यासठी पाण्यात उतरले असता बुडू लागले. मदतीसाठी हाक मारत असताना गावातीलच गजानन दत्तारामजी हे आपल्या शेतातून घरी परत येत असताना मुलांचा आरडाओरड ऐकू आला व ते बंधाऱ्याकडे धावत गेले. त्यांनी आपल्या जीवाची परवा न करता पाण्यात उडी मारली.

पाच जणांना वाचण्याचा प्रयत्न केला. यात त्यांनी विशाल उत्तम कदम, ओमकार संतोष कदम, जगदीश दुलबा कदम यांना पाण्याच्या बाहेर काढले. तर गजानन सोनाजी कदम (वय 16), दीपक दत्तारामजी मुंगल (वय 15) या बालकांचा पाण्यात बूडून मृत्यू झाला.

दरम्यान, या घटनेचे वृत्त गावात पसरताच गावकऱ्यांनी बंधाऱ्याकडे धाव घेतली. तसेच पोलिस उपविभागीय अधिकारी बाळासाहेब देशमुख, पोलिस निरीक्षक विष्णूकांत गुट्टे , जमादार कोकरे, हेमंत देशपांडे, परमेश्वर कदम ,विद्यासागर वैद्य ,संजय कळके यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup: भारतीय खेळाडू Bat Tempering करण्याचा दावा करणाऱ्या क्रिकेटपटूचा यू-टर्न; म्हणाला, 'मला तर असं काही....'

बारावीच्या पहिल्याच इंग्रजी पेपरला ४२ कॉपी केस! 'या' ६ विभागातील ४२ केंद्रांची मान्यता होणार रद्द; अमरावती, पुणे विभागात सर्वाधिक गैरप्रकार, वाचा...

UPI Service Close : मोठी बातमी! युपीआय सेवा ठप्प; लाखो व्यवहार रखडले

Amravati Student Scholarship Issue : अमरावतीमध्ये हजारो विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीवर गंडांतर ; महाविद्यालयांचा हलगर्जीपणा नडणार!

Arjun Tendulkar Wedding: अर्जुनच्या लग्नासाठी PM मोदीनांही आमंत्रण; स्वत: वरबाप सचिन तेंडुलकरने केली पोस्ट

SCROLL FOR NEXT