Beed Crime News 
मराठवाडा

चोरीच्या आरोपावरून दोन गटांत वाद, मारहाणीत चिरमुड्याचा मृत्यू

सुधीर एकबोटे

पाटोदा (जि.बीड) : चोरीच्या आरोपातून पारनेर येथे दोन गटात वाद झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये गावातील पारधी वस्तीवर काही लोकांनी हल्ला केला. या हल्ल्यामध्ये एक वर्षीय मुलगा ठार, तर आठ ते दहा जण जखमी झाले आहेत. ही घटना पाटोदा (Patoda) तालुक्यातील पारनेर येथे शनिवारी (ता.२५) मध्यरात्रीच्या दरम्यान घडली. जखमींना उपचारार्थ बीडच्या (Beed) जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी पाटोदा पोलीस ठाण्यात १० ते १२ जणांविरोधात अॅट्रॉसिटीसह खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून काही आरोपींना पोलिसांनी ताब्यात ही घेतले आहे. दरम्यान डीवायएसपी विजय लगारे, पोलीस निरीक्षक मनीष पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली असून पारनेर गावात तणावपूर्ण वातावरण आहे. या प्रकरणी भिवराबाई अभिमान काळे (वय ६५, रा. पारनेर) यांनी पाटोदा पोलीस (Crime In Beed) ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, शनिवारी मध्यरात्री बाराच्या दरम्यान गावातील बबन औटे, बाळू औटे, कचरू औटे व त्यांची तीन मुले विनोद औटे, अशोक दहीवळे , विष्णू औटे, युवराज औटे व इतर १० ते १२ जणांनी आमच्या घरात येऊन तुझा पोरगा अरुण याने आमच्या माणसाला चाकू मारला असे म्हणत काठी व लाथा बुक्क्याने मारहाण केली.

त्याच प्रमाणे जातीवाचक शिवीगाळ करून धमक्या दिल्या. तसेच पत्र्याचे शेड जाळून टाकले या मारहाणीत भिवराबाई यांचा एक वर्षीय नातू मानू उर्फ सिद्धांत अरुण काळे (वय १) याचा डोक्याला गंभीर जखम झाल्याने त्याचा मृत्यू झाला, तर शबाना अरूण काळे, विधी भोसले, अभिमान काळे, देवराबाई काळे, वनिता भोसले, करीना चव्हाण, तारामती काळे, सोजरबाई भोसले यांच्यासह अन्य आठ ते दहा जण जखमी झाले. या जखमींना उपचारार्थ बीडच्या जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांना हि माहिती मिळताच मध्यरात्री पाटोदा पोलीस ठाण्याचे पीआय मनीष पाटील, एपीआय धरणीधर कोळेकर, पीएसआय एटी पठाण , एएसआय बी.एन. कनके ,बीट अंमलदार सुनील सोनवणे,पोलीस कर्मचारी बाळू सानप, कातखडे, क्षीरसागर, गुरसाळे आदींच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात पोहोचविण्याची व्यवस्था केली. तर रविवारी उपविभागीय अधिकारी विजय लगारे यांनी घटनास्थळी तळ ठोकून होते.

चाकूने हल्ला

पारनेरमधील या घटनेला चार ते पाच दिवसांपूर्वी घडलेल्या एका घटनेची पार्श्वभूमी असल्याची चर्चा असून गावातील भगवान औटे नामक एका व्यक्तीचे बोकड पारधी समाजाच्या एका तरुणाने चोरल्याचा आरोप झाल्याच्या वादातून त्या तरुणाने या भगवान औटे यांच्यावर चाकूने हल्ला केला होता अशी फिर्याद पाटोदा पोलीस ठाण्यात देण्यात आलेली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT