two independent candidate nomination not valid mla vikram kale included  Sakal
मराठवाडा

Lok Sabha Poll : धाराशिवमध्ये दोन अपक्षांच्या उमेदवाऱ्या बाद; आमदार विक्रम काळेंचा समावेश

उमेदवारी अर्जाच्या छाननी वेळी शनिवारी (ता. २०) दोन अपक्ष उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे भाऊसाहेब आंधळकर आणि एमआयएमचे सिद्दीक बौडीवाले यांच्या उमेदवारी अर्जावरही हरकती घेण्यात आल्या होत्या.

शीतलकुमार शिंदे

धाराशिव : उमेदवारी अर्जाच्या छाननी वेळी शनिवारी (ता. २०) दोन अपक्ष उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे भाऊसाहेब आंधळकर आणि एमआयएमचे सिद्दीक बौडीवाले यांच्या उमेदवारी अर्जावरही हरकती घेण्यात आल्या होत्या. मात्र त्या हरकती फेटाळण्यात आल्याने त्यांच्या उमेदवाऱ्या राहिल्या आहेत.

दरम्यान सध्या ३४ उमेदवार निवडणूक मैदानात शिल्लक राहिले आहेत. मात्र सोमवारी (ता. २२) यातील कोणते उमेदवार आपले अर्ज वापस घेतात, त्यावर निवडणुकीचे चित्र स्पष्ट हिणार आहे. राष्ट्रवादीचे शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

यांच्यासह वर्षा कांबळे या आणखी एक अपक्ष उमेदवाराचा उमेदवारी अर्ज बाद झाला आहे. दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब आंधळकर यांनी उमेदवारी अर्जासोबत दिलेल्या शपथपत्रात संपत्तीचे विवरण चुकीचे दिल्याचे सांगत त्यांच्या विरोधी उमेदवारांनी त्यावर आक्षेप घेतला होता.

एआयएमआयएम पक्षाचे सिद्दीक शेख यांच्या अर्जातील नाव चुकेचे असल्याचा आक्षेपही घेण्यात आला होता. मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हे दोन्ही आक्षेप फेटाळून लावल्याने वंचित आणि एमआयएम या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांची उमेदवारी राहिली आहे.

दरम्यान ३६ उमेदवारांपैकी दोन पक्षांचे उमेदवारी अर्ज बाद झाल्याने आता ३४ उमेदवार निवडणूक मैदानात शिल्लक राहिले आहेत. सोमवारी (ता. २२) उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठीची तारीख आहे. मैदानात शिल्लक राहिलेल्या उमेदवारांपैकी किती जण आपली उमेदवारी मागे घेतील, त्यानंतरच येथील निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

१०० च्या जागी ५०० तर ४०० च्या २०००... ATM मध्ये मोठी बिघाड, पैसे काढण्यासाठी लोकांची झुंबड!

Mumbai-Ahmedabad Bullet Train: देशातील पहिल्या समुद्राखालील रेल्वे बोगद्याला गती; विक्रोळीत टनेल बोरिंग मशीनचा ३५० टनांचा कटरहेड यशस्वीपणे बसवला

MHADA E-Auction: म्हाडाच्या व्यावसायिक व कार्यालयीन गाळ्यांचा ई-लिलाव; २० मेपासून नोंदणी, २४ जूनला ऑनलाइन बोली

Mira Bhayandar Virar Metro: मिरा-भाईंदर ते विरार मेट्रोसाठी १७,७२४ कोटींचा नवा प्रस्ताव; मार्ग बदलून २४.९ किमी, १७ स्थानकांची योजना

Mumbai Suburban Upgrade: दादर स्थानकावर ३४ वर्षांनंतर सिग्नल यंत्रणेचा कायापालट

SCROLL FOR NEXT