Fire News Udgir  
मराठवाडा

आगीत संसारोपयोगी साहित्य खाक, दोघांसह म्हशी जखमी

विलास कांबळे

हेर (जि.लातूर) ः उदगीर तालुक्यातील करडखेल  येथे रविवारी (ता.एक) रात्री बाराच्या सुमारास लागलेल्या आगीत घरातील संसारोपयोगी साहित्य जळुन खाक झाले. यात दोघे व घरासमोर बांधलेल्या दोन म्हशी आगीत होरपळून जखमी झाल्या आहेत.  


राजाराम महादु पोपटे व पत्नी मुक्तताबाई पोपटे हे दत्ता पोपटे, जयश्री पोपटे, नामदेव पोपटे, पुजा पोपटे, सोहम पोपटे, सत्यम पोपटे हे सर्वजण कुटुंबीयांसहित रात्री जेवण करून झोपी गेले असता बाराच्या सुमारास वादळ, सोसाट्याचा वारा सुटला होता. तेव्हा या वादळ वाऱ्यात अचानक घराला आग लागली व जोराचा वारा असल्याने आगीत सर्व संसारोपयोगी साहित्य, घरातील सोयाबीन, तूर, उडीद, ज्वारी, गहू, दाळी, कपडे आदी काही वेळेतच जळुन खाक झाले. तसेच घरासमोर बांधलेल्या दोन म्हशीही आगीत होरपळून जखमी झाल्या आहेत. पत्नी व मुलगा प्राथमिक आरोग्य केंद्र हेर येथे उपचार घेत आहेत. तर म्हशीला पशुपर्यवेक्षक नारायण मुळे यांनी पोपटे यांच्या घरी जाऊन उपचार केला आहे.  


आगीत पोपटे यांचे एकंदरीत तीन लाखांचे  नुकसान झाले आहे. करडखेल येथील पोपटे यांनी  झालेले नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे. करडखेल येथील राजाराम पोपटे यांचे घर रविवारी रात्री वादळात अचानक जळुन खाक झाले. त्यात पत्नी मुक्ताबाई, मुलगा नामदेव व दोन म्हशी भाजले आहेत. घटनास्थळाचा पंचनामा करताना मंडळ अधिकारी पंडीत जाधव, सहायक   अभियंता सतीश जाधव, पशुधन पर्यवेक्षक नारायण मुळे , तलाठी गगाधर जोलापुरे, सरपंच दयानंद कसबे, पोलीस पाटील एकनाथ कसबे, बाबुराव माने, नामदेव बेडगे आदींनी केला. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अघाप समजले नाही.                      

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT