Pathardi-Visakhapatnam National Highway Accident esakal
मराठवाडा

Highway Accident : भाजीपाला घेऊन जाणाऱ्या पिकअपचा भीषण अपघात; शेतकऱ्यासह एकजण जागीच ठार

पिकअपने तीन चार पलटी घेतल्याने शेतकरी राजू बांगर व त्याचा जोडीदार यांचा जागीच मृत्यू झाला.

भास्कर सोळंके

मृत शेतकरी हा मागील काही दिवसांपासून मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यात भाजीपाला विक्रीस आणत असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

जातेगाव (जि. बीड) : भाजीपाला विक्रीस (Selling Vegetables) घेऊन चाललेल्या पिकअपच्या भीषण अपघातात शेतक-यासह त्याचा जोडीदार जागीच ठार झाल्याची घटना आज, बुधवार (ता. २६) पहाटे पाथर्डी-विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावरील मादळमोही (ता. गेवराई) येथे घडली.

बोरीखुर्द (ता. जुन्नर, जि. पुणे) भाजीपाला उत्पादक शेतकरी राजू सुरेश बांगर (वय २७) हे पिकअपमध्ये मिरची, कोबी अदी भाजीपाला घेऊन हिंगोली येथे विक्रीस चालले होते. मादळमोहीतील (ता. गेवराई) पाथर्डी- विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावर येथे पिकअपचा भीषण अपघात झाला.

पिकअपने तीन चार पलटी घेतल्याने शेतकरी राजू बांगर व त्याचा जोडीदार यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळावर जाऊन पंचनामा करुन दोन्ही मृतदेह मादळमोही प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले.

दरम्यान, जुन्नर तालुक्यात भाजीपाल्यास योग्य दर मिळत नसल्याने मृत शेतकरी हा मागील काही दिवसांपासून मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यात भाजीपाला विक्रीस आणत असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लावणीची लय, अभिनयाची जादू अन् अजरामर भूमिका; मधू कांबीकर यांची एक्झिट, मराठी कलाविश्वावर शोककळा

VIRAT KOHLI : विराट कोहलीच्या टेस्ट निवृत्तीला अजित आगरकर जबाबदार? ‘ज्या पद्धतीने त्याच्याशी वागला...’ माजी क्रिकेटपटूचं मोठं वक्तव्य

Kolhapur Ambabai Temple : नवरात्रोत्सवाच्या धामधुमीत कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात नवा वाद; देवस्थान समितीविरोधात पुजारी आक्रमक; नेमका वाद काय?

SA vs AUS 1st Test: व्हॉट अ कॅच...! स्टीव्ह स्मिथची चतुराई अन् आफ्रिकन फलंदाजचा करेक्ट कार्यक्रम; ऑसी खेळाडूचा विश्वविक्रम Video

Latest Marathi News Live Update : ज्ञानेश कुमारांविरोधातील आंदोलनासाठी महाराष्ट्रातील काँग्रेसचे १०० नेते दिल्लीत दाखल

SCROLL FOR NEXT