Two lakh rupees cash gold jewelry stolen in a house burglary at Jawkheda Thombari Marathi Crime News  
मराठवाडा

Jalna Crime : जवखेडा ठोंबरी येथे घरफोडी! दोन लाखांच्या रोख रकमेसह अडीच तोळे सोने लंपास

भोकरदन तालुक्यातील भोकरदन पोलिस ठाणे हद्दीतील जवखेडा ठोंबरी येथील शेतवस्तीवर मोठी घरफोडी झाली असल्याची घटना (ता.२९ ) रात्रीच्या सुमारास घडली आहे.

अरूण ठोंबरे

केदारखेडा : भोकरदन तालुक्यातील भोकरदन पोलिस ठाणे हद्दीतील जवखेडा ठोंबरी येथील शेतवस्तीवर मोठी घरफोडी झाली असल्याची घटना (ता.२९ ) रात्रीच्या सुमारास घडली आहे.

शेतात राहत असलेले गजानन रामकिसन ठोंबरे यांच्या राहत्या घरात अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालत सोने व रोख रक्कम चोरी केली. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक बालाजी वैद्य, पी.एस.आय. पवन राजपुत, विकास जाधव, पोलिस कॉन्स्टेबल शरद शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत श्वानपथक व ठस्से तज्ञ पथक यांना पाचारण केले.

शेतवस्ती ही जालना-भोकरदन महामार्गालगत काही मिनीटांच्या अंतरावर, शेतातील वस्तीवर असलेल्या घरात रात्री लाईट नसल्याने गजानन ठोंबरे, दुर्गाबाई ठोंबरे हे स्लॅबवर झोपायाला गेले होते. त्यांना सकाळी जाग आल्यावर दुर्गाबाई ठोंबरे यांना घराची कुलुप तुटलेल्या अवस्थेत आढळले. ही घटना त्यांनी पती गजानन ठोंबरे यांनी लगेच सांगितली. यावेळी कपाटातील बँगमध्ये असलेले दोन लाख सहा हजार व अडीच तोळे सोने हे चोरी गेल्याचे लक्षात आले. शेजारच्या शेतात बँगमधील वस्तू काढुन घेऊन बॅग फेकून देत चोर पसार झाले होते.

घरातील कपाटातील सोन्याचा ऐवज आणि रोख रक्कम लंपास झाले असल्याची माहिती ठोंबरे यांनी पोलिसांनी दिली. सदरच्या घटनेने जवखेडा ठोंबरी तसेच केदारखेडा परिसरात‌ भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील तपास भोकरदन पोलीस स्टेशन वैदय,राजपुत हे करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FASTag Rules Change : 'फास्टॅग'चे नियम बदलणार! आता ‘या’ वाहनचालकांना दुप्पट टोल भरावा लागणार

Tanya Mittal Case: तान्या मित्तलच्या अडचणीत वाढ! फसवणुकीचा गंभीर आरोप अन्...; सोशल मीडिया इन्फ्लुएंसरकडून तक्रार दाखल

Mumbai Metro: मेट्रो ३ प्रवास आता अधिक सोपा! फीडर बस सेवेचा शुभारंभ, दर किती अन् कुणाला फायदा होणार?

Latest Marathi News Live Update : हिंगोलीत विद्यार्थी व शिक्षकाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना

Horoscope Prediction : येत्या 10 तासांमध्ये बदलणार तीन राशींचं नशीब ! बुध आणि गुरूच्या युतीमुळे होणार अफाट श्रीमंत

SCROLL FOR NEXT