Udgir Corona Updates, Latur 
मराठवाडा

उदगीरमध्ये आणखी दोघांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह, बाधितांची संख्या दहा

सुशांत सांगवे

लातूर : लातूर जिल्ह्यातील उदगीरमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा दिवसाआड वाढताना दिसत आहे. त्यातच आता आणखी दोन व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल रविवारी (ता. तीन) पॉझिटिव्ह आला. त्या अहवालामुळे उदगीरमधील कोरोनाबाधितांची संख्या आता दहा झाली आहे. या सर्वांवर उदगीरमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


उदगीरमध्ये कोरोनाबाधित महिलेचा शनिवारी (ता.२५) मृत्यू झाला. या घटनेमुळे उदगीरमधील डॉक्टर, परिचारिका आणि संबंधित महिलेच्या नातेवाईकांना ‘कोरोना’ची लागण झाली आहे का, याची तपासणी दररोज केली जात आहे. डॉक्टर, परिचारिकांना, स्वच्छता कर्मचारी यांना कोरोनाची लागण झाली नसल्याचे आजवरच्या तपासणीत आढळून आले आहे. पण, संबंधित महिलेल्या कुटुंबियांना कोरोनाची लागण झाली असल्याचे विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेने स्पष्ट केले आहे. याआधी तपासणी झालेल्या उदगीरमधील आठ व्यक्तींना कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे आढळून आले होते.


विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत रविवारी (ता.तीन) एकूण १३ व्यक्तींचे  स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी १२ व्यक्तीचे स्वॅब उदगीर येथून आले होते. त्यापैकी चार व्यक्तीचे अहवाल अंतिम आले नसल्यामुळे त्यांच्या स्वॅबची ४८ तासानंतर पुनर्तपासणी करण्यात आली. त्यातील दोन व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह, एका व्यक्तीचा अहवाल निगेटिव्ह आणि एका व्यक्तीचा अहवाल पुन्हा अंतिम आला नसल्यामुळे त्यांची पुन्हा ४८ तासानंतर स्वॅब घेऊन पुनर्तपासणी करण्यात येणार आहे. उर्वरित नव्याने आलेल्या आठ व्यक्तींचे अहवाल हे निगेटिव्ह आले आहेत. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत तपासणीसाठी आलेल्या एका व्यक्तीच्या अहवाल निगेटिव्ह आला आहे. सद्यःस्थितीत एकही अहवाल प्रलंबित नाही, अशी माहिती संस्थेचे अधिष्ठाता डॉ. गिरीष ठाकूर यांनी दिली.


लातूर :
---
एकूण बाधित : १९
---
रुग्णांवर उपचार : १०
बरे झालेले रुग्ण : ०८
मृत्यू : ०१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT